पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:10+5:302021-06-02T04:15:10+5:30
महानगरपालिका कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आयुक्त देविदास पवार, सभागृह नेते माजू लाला, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, भगवान यादव, ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
महानगरपालिका कार्यालय
येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आयुक्त देविदास पवार, सभागृह नेते माजू लाला, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, भगवान यादव, सुधाकर किंगरे, मुकुंद कदम, अभिजीत कुलकर्णी, उमेश जाधव, कैलास ठाकूर, कैलास काकडे, रंगनाथ गरुड आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड परभणी
येथील संभाजी ब्रिगेड तसेच राजे अहिल्या संयुक्त स्मारक समितीच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, अशी मागणी दिनकर गरुड, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, राजेश बालटकर आदींनी केली. कार्यक्रमास गणेशराव घाटगे, गंगाधर जवंजाळ, प्रशांत वांघीकर, महेश जोगदंड, स्वप्नील गरुड, दीपक देशमुख, रामेश्वर थोरात, अमित सोळंके, सचिन गायकवाड, अमोल अवकाळे, प्रताप मोहिते, कृष्णा सोनवणे, लल्ला मोहिते, धारा काळे, सचिन साबळे, नदीम खान आदींची उपस्थिती होती.
ताडकळस येथे कार्यक्रम
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव आंबोरे, मनोज हजारे आदींची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यातील दैठणा येथील खंडोबा मंदिरातही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली.