परभणीत शिवसेनेची जाहीर सभा : मेडिकल कॉलेज नव्या सरकारमध्ये सुरू करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:41 PM2019-10-13T23:41:23+5:302019-10-13T23:41:42+5:30

परभणीकरांनी आत्तापर्यंत शिवसेनेच्या भगव्यावर भरभरून प्रेम केले आहे़ त्यामुळे जे वचन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे़ जिल्ह्यात मंजूर झालेल्या जय भवानी सुतगिरणीला पूर्ण ताकद देणार असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, नवीन सरकार आल्यानंतर प्रत्यक्ष त्यास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना दिले़

Public meeting of Shiv Sena in Parbhani: We will start medical college in new government | परभणीत शिवसेनेची जाहीर सभा : मेडिकल कॉलेज नव्या सरकारमध्ये सुरू करू

परभणीत शिवसेनेची जाहीर सभा : मेडिकल कॉलेज नव्या सरकारमध्ये सुरू करू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीकरांनी आत्तापर्यंत शिवसेनेच्या भगव्यावर भरभरून प्रेम केले आहे़ त्यामुळे जे वचन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे़ जिल्ह्यात मंजूर झालेल्या जय भवानी सुतगिरणीला पूर्ण ताकद देणार असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, नवीन सरकार आल्यानंतर प्रत्यक्ष त्यास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना दिले़
परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव, उमेदवार डॉ़ राहुल पाटील, माजी आ़ विजय गव्हाणे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ़ विवेक नांवदर, आ. मोहन फड, गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ सिद्धार्थ भालेराव, डी़एऩ दाभाडे, शिल्पा सरपोतदार, अंबिका डहाळे, सदाशिव देशमुख, नंदू आवचार, सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रारंभापासूनच परभणी जिल्ह्याने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे़ परभणीकरांच्या धमण्यात भगवं रक्त वाहतं, त्यामुळे येथील जनतेची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे़ मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश झाला नाही, हे समजलं; परंतु, या जिल्ह्याचा आपण समावेश करणार असा मी शब्द देतो़ जिल्ह्यातील जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीला मंजुरी मिळून शासनाचा निधीही वर्ग झाला आहे़ या सुतगिरणीला आपण पूर्णपणे ताकद देणार आहे़ परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे़ नवीन सरकार आल्यानंतर त्यास सुरुवात करणार आहे़ परभणीतील साखर कारखान्याची मागणीही पूर्ण करायची असेल तर शिवसेना-भाजपाशिवाय समोर कोण आहे ? असा सवाल करून त्यांनी महायुती विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव यांनी परभणी जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही़ त्यामुळे जिल्ह्यात चांगला उद्योग आणावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली़ यावेळी अरविंद देशमुख, संग्राम जामकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले़ या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
मंत्रीऽ मंत्रीऽऽ मंत्री घोषणाबाजी
४उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना उपस्थित जनसमुदायातून मंत्रीऽ मंत्री ऽऽ मंत्री अशा सातत्याने घोषणा देण्यात येत होत्या़ यावेळी भाषण थांबवून उद्धव ठाकरे म्हणाले की, आ़ डॉ़ राहुल पाटील यांना २०१४ मध्ये युती नसताना भरघोस मतांनी निवडून दिले़ आता आमची युती आहे़ त्यामुळे राहुलचं काय करायचं (मंत्री मंत्री घोषणेबाबत) ते मी पाहतो, समोरच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून तिप्पट मतांनी राहुलला विजयी करा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले़
बाजोरियांच्या उच्चारानंतर निष्क्रियतेचा घोष
४यावेळी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आ़ विप्लव बाजोरिया व्यासपीठावर उपस्थित होते़ त्यांच्या नावाचा उच्चार व्यासपीठावर झाल्यानंतर समोरून निष्क्रिय आमदार अशा घोषणा काही कार्यकर्त्यांनी दिल्या़ बाजोरिया हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या वेळीच किंवा मोजक्या वेळीच परभणीत येतात़ इतर वेळी त्यांचा परभणीशी काहीही संबंध नसतो़ ते गायब असतात. त्यामुळे ते अत्यंत निष्क्रिय आहेत, असा संताप यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केला़
साखर कारखाना मंजूर करा : राहुल पाटील
४यावेळी राहुल पाटील म्हणाले, रोजगारयुक्त परभणी करण्याचा संकल्प केला असून, याचाच एक भाग म्हणून जय भवानी सहकारी सुतगिरणीला मंजुरी मिळाली़ यासाठी शासनाने ६ कोटींचा निधीही दिला आहे़ जवळपास ३ हजार लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल़ भविष्यात मतदार संघातील औद्योगिकीकरण वेगाने झाले पाहिजे, यासाठी परभणीत साखर कारखाना मंजूर करावा, अशी मागणी यावेळी डॉ़ पाटील यांनी केली़ २५० बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जापेक्षा १ टक्का कमी दराने कर्ज देवून महिलांची आर्थिक सक्षमता घडविण्याचा प्रयत्न केला़ या पुढेही मतदार संघात विकासाचे राजकारण करणार असून, जनतेने २०१४ मध्ये भरभरून प्रेम दिले़ यावेळेसही मतपेटीतून मोठ्या प्रमाणात आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन यावेळी आ़ डॉ़ पाटील यांनी केले़

Web Title: Public meeting of Shiv Sena in Parbhani: We will start medical college in new government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.