कर न भरल्यास मालमत्ता होणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:59+5:302021-02-09T04:19:59+5:30
परभणी : मालमत्ता आणि पाणी कराचा वेळेत भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मालमत्ता जप्त करून थकीत रक्कम वसूल ...

कर न भरल्यास मालमत्ता होणार जप्त
परभणी : मालमत्ता आणि पाणी कराचा वेळेत भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मालमत्ता जप्त करून थकीत रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी दिला आहे.
शहरातील नागरिकांकडे मालमत्ता आणि पाणी कराची मागील अनेक वर्षांपासूनची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक कर भरत नसल्याने मनपाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा नागरिकांनी त्यांच्याकडील कराची थकबाकी प्रभाग समिती कार्यालयात जमा करावी. तसेच परभणीएमसी डॉट ओआरजी या लिंकवरून ऑनलाइन कर भरण्याची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा मालमत्ता व इतर करांची थकबाकी वेळेत जमा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मालमत्ता जप्त करून तिचा कायदेशीर लिलाव केला जाईल. त्याचप्रमाणे थकबाकीदार नागरिकांच्या नावासह फलक, होर्डिंग्ज मोक्याच्या ठिकाणी लावले जातील, असा इशारा आयुक्त पवार यांनी दिला आहे.