बेसुमार वाळू उपशाने वाढल्या समस्या

By Admin | Updated: December 1, 2014 14:59 IST2014-12-01T14:59:26+5:302014-12-01T14:59:26+5:30

मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली.

The problem of untidy sand subspecies | बेसुमार वाळू उपशाने वाढल्या समस्या

बेसुमार वाळू उपशाने वाढल्या समस्या

उद्धव चाटे /गंगाखेड

परभणी- गोदावरी, दुधना, पूर्णा, वाण, करपरा या नद्यांनी परभणी जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केले. कसदार जमीन आणि आश्‍वासित जलस्त्रोत यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भरच पडली. परंतु, मागील काही वर्षांपासून नदीपात्रातील वाळू उमस्याने समस्यांना उभारी दिली आहे. पाणी आणि रस्त्यांची समस्या बिकट झाली. महसूल प्रशासनाला वाळू ठेक्यातून मोठा महसूल मिळला असला तरी त्याच्या कितीतरी पटीत नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे बेसुमार वाळू उपस्याला लगाम घालण्यासाठी वेळीच पाऊले उलण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील वाळू उपसा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या याचा हा आढावा.
गोदावरी काठावरील झोला, खळी, गौंडगाव, चिंचटाकळी, धारखेड, नागठाणा, महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, दुसलगाव, मैराळ सावंगी, मसला, पिंपरी झोला या ठिकाणच्या नदी पात्रातून वाळूची तस्करी होत आहे. याचा त्रास शेतकरी व परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. शहराजवळील गोदावरील रेल्वे पुलाजवळही छोट्या-मोठय़ा वाळू तस्कराने थैमान घातले आहे. २0१३-१४ साठी तालुक्यात लिलाव झाले होते. नियमानुसार ३0 सप्टेंबर रोजी या लिलावाची मुदत संपली आहे. परंतु, गोदावरी पात्र कोरडे पडल्याने वाळू तस्करांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात महसूल प्रशासनाने ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी आदी वाहनांवर कारवाई करुन वाळू तस्करांकडून तीन लाखांचा दंड वसूल केला असला तरी मोठय़ा कारवाईची गरज आहे. निर्ढावलेल्या वाळू तस्करांवर लगाम बसला नाही तर अनर्थ होण्याची शक्यता जनतेतून ऐकावयास मिळत आहे. 
भरमसाठ वाळू भरुन वाहने गोदापात्रातून नेली जातात. नियम डावलून उपसा होतो. परंतु, प्रशासन मात्र कारवाई करीत नाही. 
गोदावरी पात्रातून वाळू उपस्याला लगाम बसावा, यासाठी पात्रात मालवाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर, टिप्पर या सारख्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, २१ नोव्हेंबरपासून लागू केले आहेत, अशी माहिती तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी दिली. गंगाखेड शहरालगतचे ओसाड पडलेले गोदावरी पात्र सामान्यांना होतोय त्रास
> वाळू वाहतुकीमुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वाळू वाहतूक करणारे वाहन ज्या रस्त्याने नेले जाते. ते रस्ते खराब झाले आहेत. ग्रामस्थांच्या दररोजच्या वाहतुकीचे हे रस्ते खड्डे पडून चाळणी झाले आहेत. वाळू उपस्यामुळे गावातील विहिरी व हातपंपांच्या पाणी पातळीवरही परिणाम होत आहे.
सिंह यांनी घालावे लक्ष
> वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे

Web Title: The problem of untidy sand subspecies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.