शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एम. एस. लोया हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, संजय मगर, डी.के. देशपांडे, विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाने, सीताराम मंत्री, दत्ता पावडे, शरद कुलकर्णी, संगीता खराबे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पाचवी ते आठवी या गटात तनिष्का तेलभरे, समृद्धी मुळी, उन्नती भोसिकर, आर्य पांडव, नववी ते बारावी गटात स्नेहल घोडके, भाग्यश्री मोहिते, पल्लवी शिंदे, श्रावणी वाघ, स्नेहा आंधळे तर शिक्षक व प्राध्यापक गटात डॉ. भाग्यश्री धामणगावकर, प्रणिता सोलापुरे, प्रा. कीर्ती डोईफोडे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, वीरेश कडगे यांचा समावेश आहे.
ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST