सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:03+5:302021-02-05T06:06:03+5:30
परभणी : येथील बालविद्यामंदिर शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले. पाचवी ते बारावीच्या ...

सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण
परभणी : येथील बालविद्यामंदिर शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले.
पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग नावंदर, सदस्य एम.जी. विहिटकर, मुख्याध्यापक ए.यू. कुलकर्णी, शामा मुधळवाडकर, गरुड, सिंधी परदेशी, पी.व्ही. रुघे, आर.जी. तुम्मेवार, अरुण बोराडे, अनिकेत शहाणे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या स्पर्धेत अ गटात हरिप्रसाद राजाप्रभू जाधव, विशाल संतोष गिरगावकर, दीपक प्रभाकर तारडे, रंगनाथ संभाजी मोरे, अन्वय अमोल जोशी, मंजिरी दीपक माळोदे, आदित्य अशोक मोरे, अथर्व दिलीप बिनगे, विशाल अंभुरे हे स्पर्धक विजेते ठरले. ब गटात तुळशीराम शिनगारे, रोहिणी खरात, पीयूष दवंडे, श्रीकांत गव्हाणे तर क गटात मल्हार योगेश गौतम, किरण बालासाहेब लाड, वैष्णवी विष्णू वैद्य हे स्पर्धक विजेते ठरले आहेत. या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.
याच कार्यक्रमात वैज्ञानिक म्हणूृन निवड झालेली वेदिका कुल्थे, शिल्पकला स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर निवड झाल्याबद्दल भक्ती बोचरे तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल गायत्री निलंगे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.