पाथरी तालुक्यातील २४ सहकारी संस्थाच्या निवडणुकीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:50+5:302021-02-06T04:29:50+5:30

पाथरी: कोविडच्या प्रभावामुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या तालुक्यातील २४ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीची पूर्व तयारी सहायक निबंधक ...

Preparations for the election of 24 co-operative societies in Pathri taluka | पाथरी तालुक्यातील २४ सहकारी संस्थाच्या निवडणुकीची तयारी

पाथरी तालुक्यातील २४ सहकारी संस्थाच्या निवडणुकीची तयारी

पाथरी: कोविडच्या प्रभावामुळे मागील वर्षभरापासून रखडलेल्या तालुक्यातील २४ विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकीची पूर्व तयारी सहायक निबंधक कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. मतदार याद्या बनविण्यासाठी सेवा संस्थेच्या गटसचिव यांची विशेष बैठक घेण्यात आली.

ग्रामीण भागातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या आणि सहकार क्षेत्राचा कणा समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मागील वर्ष भरापासून रखडलेल्या निवडणुका येत्या काही दिवसात होऊ लागतल्या आहेत. शासनाने परवानगी दिल्यानंतर त्या दृष्टीने सहायक निबंधक कार्यालयाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सचिवांची आढावा बैठक सहायक निबंधक माधव यादव यांच्या उपस्थितीत येथील बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या बनविण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

पाथरी तालुक्यात ३३ विविध कार्यकारी सेवा संस्था कार्यरत आहेत.त्यातील ९ सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका गतवर्षी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता २४ सेवा संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

बाजार समितीसाठी मतदार

सेवा संस्थेच्या सदस्यांचे बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी मतदान असते. त्यामुळे या निवडणुकीत आपल्या गटाचे सदस्य निवडून यावे, यासाठी प्रयत्न होतात. त्यामुळे या निवडणुकीला अधीकच महत्त्व प्राप्त झाले आहे.

या आहेत २४ संस्थासेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी सहायक निबंधक कार्यालयाकडून तयारी सुरू झाली आहे. २४ संस्थामध्ये खालील संस्थेचा समावेश आहे. विटा बु., तारुगव्हान, टाकळगव्हान, बंदरवाडा, झरी, बाभळगाव, नाथरा, पाथरगव्हाण, वाघाळा,सिमुरगव्हाण,उमरा, कानसुर,कासापुरी, वडी, गोपेगव ,मुद्ग‌ल, पाथरी, गुंज ,बानेगाव, रेणाखळी,जवळा झुटा आणि लिंबा या संस्थेचा समावेश आहे.

Web Title: Preparations for the election of 24 co-operative societies in Pathri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.