अत्याचार प्रकरणी आंदोलनाची तयारी

By Admin | Updated: May 30, 2014 00:11 IST2014-05-30T00:02:57+5:302014-05-30T00:11:53+5:30

परभणी : महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाला काळीमा फासणार्‍या घटना दररोज घडत आहेत.

Preparations for agitation in the case of atrocities | अत्याचार प्रकरणी आंदोलनाची तयारी

अत्याचार प्रकरणी आंदोलनाची तयारी

परभणी : महाराष्ट्राच्या पूर्वगामित्वाला काळीमा फासणार्‍या घटना दररोज घडत आहेत. त्यामुळे दलित समूहामध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक शनिवार बाजार विश्रामगृह प्रांगणात विजय वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीचे संयोजक डी.एन.दाभाडे यांनी अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची ताकद निर्माण करण्याचे आवाहन केले. तर विजय वाकोडे यांनी बौद्ध दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची मागणी केली. यशवंत मकरंद यांनी संवैधानिक चौकटीत सम्यक आंदोलन उभारण्याची गरज प्रतिपादित केली. यावेळी प्रेमानंद बनसोडे, रवी सोनकांबळे, भीमराव वायवळ, नागेश सोनपसारे, सुधीर साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्याचे यावेळी ठरविले. यावेळी बी.एच.सहजराव, पत्रकार डी.टी.शिंदे, आशाताई मालसमिंदर, राणुवाई वायवळ, द्वारकाबाई गंडले, चंद्रकांत लहाने, अप्पा गाडे, संजीव अढागळे, मंचक खंदारे, बाळासाहेब गायकवाड, बी.एस.लहाने, अरुण गायकवाड, शेषराव नंद, सुभाष साळवे, भाऊराव सावणे, विनोद कनकुटे, सखाराम मस्के आदी उपस्थित होते. मनोहर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. मंचक खंदारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Preparations for agitation in the case of atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.