इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:14 IST2020-12-26T04:14:03+5:302020-12-26T04:14:03+5:30
रस्त्यावर गिट्टी, ग्रामस्थ त्रस्त पोखर्णी नृसिंह : परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा ते गाव या दोन कि.मी. दरम्यान रस्त्यावरील गिट्टी ...

इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू
रस्त्यावर गिट्टी, ग्रामस्थ त्रस्त
पोखर्णी नृसिंह : परभणी तालुक्यातील पोखर्णी फाटा ते गाव या दोन कि.मी. दरम्यान रस्त्यावरील गिट्टी इतरत्र पसरल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
पोखर्णी ते पाथरी या राज्यरस्त्याचे काम सुरू असून पोखर्णी फाटा ते गाव या रस्त्यावर गिट्टी अंथरली आहे. ही गिट्टी संपूर्ण रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने वाटेवरून ये- जा करणाऱ्या दुचाकीचालकांना अडचण होत आहे. दिवसभरात तीन ते चार वाहने घसरून पडत आहेत. याकडे संबंधितांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गिट्टीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना रानडुकरांची धास्ती
खंडाळी- गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा वावर वाढला आहे. शेतात रानडुकरे रबी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक शेतकरावर रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अवैध उत्खनन करणारा जेसीबी पकडला
सोनपेठः तालुक्यातील खडका येथे अवैध गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या जेसीबी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची कारवाई २५ डिसेंबर रोजी करण्यात आली. तालुक्यातील खडका शिवारात जेसीबीच्या साह्याने मुरुमाचे उत्खनन चालू होते. यावेळी तहसीलदार आशिषकुमार बिरादार, सपोनि श्रीनिवास भिकाने, पोहेका आत्माराम पवार यांनी उत्खनन करणाऱ्या जेसीबी (क्र. एमएच २२ एन ४५७७) वर कारवाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले.