मशालफेरीचे परभणीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:37 IST2018-02-17T00:37:08+5:302018-02-17T00:37:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील शिवपे्रमींनी शिवनेरी किल्ल्यावरून मशालफेरी काढली. या मशालफेरीचे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरात स्वागत करण्यात आले.

Prehuman welcome | मशालफेरीचे परभणीत स्वागत

मशालफेरीचे परभणीत स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील शिवपे्रमींनी शिवनेरी किल्ल्यावरून मशालफेरी काढली. या मशालफेरीचे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरात स्वागत करण्यात आले.
शहरातील विसावा चौकातून ही मशालफेरी महाराणा प्रताप चौक, नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, गांधीपार्क, विसावा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आल्यानंतर मशालफेरीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये शंकर देशमुख, सोनू पाटील, महेंद्र सोनपेठकर, गणेश देशमुख, अथर्व वैद्य, सुजय पाठक, राहुल कटारे आदी शिवप्रेमींचा सहभाग होता. शिवप्रेमींनी १९ फेब्रुवारी रोजी निघणाºया सार्वजनिक शिवजयंतीत परिवारासह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Prehuman welcome