कोव्हॅक्सिनला पसंती; मात्र कोविशिल्डचीच लस अधिक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:13 IST2021-06-23T04:13:11+5:302021-06-23T04:13:11+5:30
परभणी : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक असल्या तरी जिल्ह्यात कोव्हॅक्सिनला नागरिकांची पसंती आहे. मात्र, सद्यस्थितीला कोविशिल्डची ...

कोव्हॅक्सिनला पसंती; मात्र कोविशिल्डचीच लस अधिक !
परभणी : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी परिणामकारक असल्या तरी जिल्ह्यात कोव्हॅक्सिनला नागरिकांची पसंती आहे. मात्र, सद्यस्थितीला कोविशिल्डची लस मोठ्या प्रमाणात असल्याने बहुतांश नागरिकांना कोविशिल्डची लस मिळाली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण जिल्ह्यात सुरू आहे. मंगळवारपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला कोविशिल्ड लस उपलब्ध असून, कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे. असे असले तरी कोव्हॅक्सिनची लस घेण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. मध्यंतरी ही लस मिळावी म्हणून अनेकांनी बराच काळ प्रतीक्षाही केली होती. मात्र, सद्यस्थितीला या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्याच साह्याने नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
कोव्हॅक्सिनच का ?
n कोविशिल्ड लस घेतल्यानंतर अंग दुखते, ताप येतो, असा नागरिकांचा समज आहे. त्या तुलनेत कोव्हॅक्सिन घेतल्यास जास्त त्रास होत नाही.
n कोव्हॅक्सिनची लस घेतल्यास दुसऱ्या डोसचा कालावधी कमी आहे. त्यामुळे दोन्ही डोस लवकर पूर्ण होतात.
n कोविशिल्डपेक्षा कोव्हॅक्सिनची लस माईल्ड आहे. त्यामुळे ही लस मिळावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
दोन्ही लसी तेवढ्याच परिणामकारक आहेत. त्यामुळे ठराविक लसीची प्रतीक्षा न करता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी लस घेऊन प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित करावे. जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. रावजी सोनवणे, माता बाल संगोपन अधिकारी