चारठाणा येथील वीज पुरवठा आठ तास खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:22+5:302021-04-11T04:17:22+5:30

चारठाणा हे जिंतूर तालुक्यातील मोठे गाव असून, ३३ केव्ही उपकेंद्राचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी सहायक अभियंता व लाईनमन ...

Power supply at Charthana cut off for eight hours | चारठाणा येथील वीज पुरवठा आठ तास खंडित

चारठाणा येथील वीज पुरवठा आठ तास खंडित

चारठाणा हे जिंतूर तालुक्यातील मोठे गाव असून, ३३ केव्ही उपकेंद्राचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी सहायक अभियंता व लाईनमन नसल्याने ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चारठाणा गावाला वीज पुरवठा करणारी मुख्य वाहिनी तुटली. त्यामुळे पहाटेपासूनच गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर उकाड्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागला. आठ तास गावाचा वीज पुरवठा खंडित राहिला. महावितरणच्या या कारभारामुळे ग्रामस्थांत नाराजी व्यक्त केली जात आहे. चारठाणा येथील उपकेंद्राला परिसरातील अनेक गावे जोडलेली आहेत. परंतु, महावितरणच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Power supply at Charthana cut off for eight hours