कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:15+5:302021-02-06T04:29:15+5:30
ऊर्जा उद्योगाचे खाजगीकरण करण्यासाठी तयार केलेले विद्युत बिल व स्टॅडंर्ड बिडिंग डाॅकूमेंट रद्द करावे, सध्या कार्यरत असलेल्या देशातील सर्व ...

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज सेवा विस्कळीत
ऊर्जा उद्योगाचे खाजगीकरण करण्यासाठी तयार केलेले विद्युत बिल व स्टॅडंर्ड बिडिंग डाॅकूमेंट रद्द करावे, सध्या कार्यरत असलेल्या देशातील सर्व फ्रन्चासीज् रद्द कराव्यात, केरळ व हिमाचल प्रदेश विद्युत मंडळाप्रमाणे देशातील वीज कंपन्यांचे एकत्रिकरण करुन वीज मंडळाचे पुनर्गठन करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, सक्तीच्या सेवानिवृत्त योजनांचे प्रावधान रद्द करावे, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला.
एक दिवसाच्या या लाक्षणिक संपामुळे जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्याचप्रमाणे बिल वसुलीवरही परिणाम झाला. या आंदोलनात किशोर गायकवाड, सुरेश लुटे, प्रभाकर राखुंडे, दीपक विव्हळे, किशन दुधारे, रवी गायकवाड, मुकेश वाव्हळ, सुरेखा वाघमारे, सुनील वाघमारे, अमोल चव्हाळ, ज्ञानेश्वर लहाने, शिवाराम गिरी, शेख शमशोद्दीन, सिद्धेश्वर भिसे, संतोष ठाकूर, पंकज पतंगे, शेख जमीर भाई यांच्यासह मंडळातील ११० कायम वीज कामगार आणि ६० कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते.