कृषी क्षेत्रात न्यूमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:28+5:302021-05-28T04:14:28+5:30
परभणी : कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कृषी क्षेत्रात ...

कृषी क्षेत्रात न्यूमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य
परभणी : कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कृषी क्षेत्रात व कृषी प्रक्रिया उद्योगात करता येऊ शकतो, असे मत मुंबई येथील एसएमसी इंटरनॅशनल प्रा. लि.,चे वासुदेव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्कृत नाहेप प्रकल्पाच्यावतीने २४ मे ते ४ जून या काळात ''हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक कार्यप्रणालीचा कृषी क्षेत्रात वापर'' या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे. कुलगुरू डॉ. अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या प्रशिक्षणात मुंबई येथील एसएमसी इंटरनॅशनल प्रा.लि.,चे वासुदेव गाडगीळ, प्रा. एस. बी. लहाने आणि औरंगाबाद येथील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. व्ही. वाय. गोसावी हे मार्गदर्शन करीत आहेत.
२४ मे रोजी नाहेपचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे व वासुदेव गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी गाडगीळ बोलत होते. यावेळी गोपाळ शिंदे यांनी प्रशिक्षणार्थींना नाहेपच्या विविध योजना व प्रशिक्षणाची माहिती दिली.
डॉ. नरेंद्र खत्री यांनी सूत्रसंचालन केले. अनिकेत वाईकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. शिवराज शिंदे, अविनाश काकडे, रविकुमार कल्लोजी, रामदास शिंपले, मुक्ता शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षणात देशभरातील पदव्युत्तर व आचार्य पदवीधारक प्राध्यापक, शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला.