दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:50+5:302021-06-04T04:14:50+5:30
परभणी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आता पुढे येत आहे. या व्यवसायात आधुनिकता स्वीकारून आर्थिक उन्नती करणे शक्य ...

दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती शक्य
परभणी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आता पुढे येत आहे. या व्यवसायात आधुनिकता स्वीकारून आर्थिक उन्नती करणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. माणिक धुमाळ यांनी केले.
येथील कृषी विज्ञान केंद्रात जागतिक दुग्ध दिन साजरा करण्यात आला. या निमित्त २२ मे ते १ जून या काळात पशुधनाचे आरोग्य, उत्पादकता व व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १ जून रोजी जागतिक दुग्ध दिन साजरा करण्यात आला. आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माणिक धुमाळ, अकोला येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. गिरीश पंचभाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. माणिक धुमाळ यांनी स्वच्छ दूध उत्पादनाचे महत्त्व, दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर कासेचे निर्जंतुकीकरण याविषयी पशुपालकांना माहिती दिली. डॉ गिरीश पंचभाई यांनी आहार व्यवस्थापन तसेच आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ इम्रान खान यांनी सूत्रसंचालन केले. अमित तुपे, अरुणा खरवडे, सवाईसिंग निठारवल, अमोल काकडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.