कोथळळा येथील आरोग्य केंद्राची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:25 IST2021-09-10T04:25:01+5:302021-09-10T04:25:01+5:30
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समशेर वरपूडकर यांच्यासह कोथळा येथील सरपंच सुनील पाते, ज्ञानेश्वर सिद्धनाथ, अशोक रोकडे, अनिल पाते, उत्तम ...

कोथळळा येथील आरोग्य केंद्राची दुरवस्था
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समशेर वरपूडकर यांच्यासह कोथळा येथील सरपंच सुनील पाते, ज्ञानेश्वर सिद्धनाथ, अशोक रोकडे, अनिल पाते, उत्तम गोरे, कोंडीबा बावणे, रामेश्वर सिद्धनाथ, आदींनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर हा प्रश्न मांडला. कोथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. मागील वर्षभरापासून हे बांधकाम रखडले आहे. त्याचप्रमाणे लाईट फिटिंग, पाण्याची सुविधा, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, आदी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या उपकेंद्राला संरक्षक भिंत नसल्याने उपकेंद्राची दुरवस्था वाढली आहे. प्राथमिक उपकेंद्रांमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने कोथळा आणि परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. तेव्हा या ठिकाणची इमारत बांधकाम पूर्ण करावे तसेच परिचारिका आणि वैद्यकीय तज्ज्ञाची नियुक्ती करावी व हे आरोग्य उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.