पोलिसाचे मारले पॉकेट
By Admin | Updated: February 3, 2015 17:08 IST2015-02-03T17:08:56+5:302015-02-03T17:08:56+5:30
बसमध्ये चढणार्या एका पोलिस कर्मचार्याचे पॉकेट चोरताना चोरट्यास रंगेहाथ पकडल्याची घटना २फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.

पोलिसाचे मारले पॉकेट
गंगाखेड : बसमध्ये चढणार्या एका पोलिस कर्मचार्याचे पॉकेट चोरताना चोरट्यास रंगेहाथ पकडल्याची घटना २फेब्रुवारी रोजी सकाळी घडली.
गंगाखेड येथील बसस्थानकात प्रवाशांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर असते. प्रवासी बसमध्ये चढताना पाकिटमार प्रवाशांचे पॉकेट मारत आहेत. मात्र याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने पाकिटमारांनी बसस्थानकामध्ये उच्छांद मांडला आहे. पोलिस कर्मचारी बादल हे सोमवारी सकाळी १0 वाजता परभणी- अहमदपूर बस (क्रमांक एम. एच. 0६- एस. ८७८१) या गाडीमध्ये चढताना शेख नाजूक शेख आसीम (वय ६८) या चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पॉकेट मारले. पोलिस कर्मचार्याच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने प्रवाशांच्या मदतीेने शेख नाजूक शेख आसीम या खिसेकापूस पकडूून पोलिस चौकीत आणले वत्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे पॉकेट आढळून आले.
पो.कॉ. सुग्रीव कांदे यांच्याकडे चोरट्यास स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. /(वार्ताहर)
■ गंगाखेड येथील बसस्थानकामध्ये पाकीटमार सक्रिय झाले आहेत. पोलिस प्रशासन पाकीटमारावर थातूरमातूर कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते.त्यामुळे पाकीटमारांचे मनोधैर्य वाढले आहे. पोलिसांनी या चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी
गंगाखेड- शहरातील तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वाराने धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. नारायण मारोती मुंडे (रा. बडवणी, ता.गंगाखेड) हे तहसील कार्यालयाजवळ बसमध्ये चढत असताना दुचाकीच्या (क्रमांक एम.एच.0९-बी.एन.0८९0) चालकाने जोराची धडक दिली. यामध्ये नारायण मुंडे हे गंभीर जखमी झाले. मुंडे यांच्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नायक विजय जाधव करीत आहेत.