शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लाचेच्या रकमेसह पोलीस उपनिरीक्षक, शिपाई फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:53 PM

जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच

ठळक मुद्देगंगाखेड येथील घटना लाचलुचपत विभागाची कारावाई

गंगाखेड (जि. परभणी) : जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर एसीबीच्या जाळ्यात सापडल्याची चाहूल लागताच  सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक आणि एक शिपाई लाचेच्या रकमेसह फरार झाल्याची घटना २० जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 

सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू उपसा करण्याच्या कामासाठी चालणाऱ्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्यासाठी सोनपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गिते व पोलीस शिपाई भालेराव हे पैशाची मागणी करीत असल्याची  तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. त्यावरुन या विभागाचे पोलीस उपाधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, जमादार हनुमंते, पोलीस नाईक अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, सचिन धबडगे, बोके आदींच्या पथकाने २० जून रोजी सायंकाळी गंगाखेड हद्दीतील परळी रस्त्यावर सापळा लावला. तक्रारदाराने दिलेली लाचेची रक्कम स्वीकारताच आपण एसीबीच्या जाळ्यात सापडल्याची चाहूल लागल्याने उपनिरीक्षक गिते व शिपाई भालेराव हे दोघेही लाचेची रक्कम घेऊन पसार झाले. 

पोलीस दलात खळबळलाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गिते व शिपाई भालेराव यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलिसांवरच झालेल्या कारवाईने गंगाखेड व सोनपेठ तालुक्यातील पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस