महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पकडली दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:50+5:302021-04-12T04:15:50+5:30
तालुक्यातील हादगाव येथील महिला अवैध दारूविक्रीच्या प्रकाराला वैतागल्या होत्या. गावात दारू सहज मिळत असल्याने सकाळपासून दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांची ...

महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पकडली दारू
तालुक्यातील हादगाव येथील महिला अवैध दारूविक्रीच्या प्रकाराला वैतागल्या होत्या. गावात दारू सहज मिळत असल्याने सकाळपासून दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांची संख्या वाढली होती. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन ८ एप्रिल रोजी पात्री पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांना अवैध दारूविक्री बंद करण्यासंदर्भात तक्रार करून निवेदन दिले. त्यानंतर १० एप्रिल रोजी पोलिसांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हादगाव गावाजवळील पुलाशेजारी आरोपी गणेश बाबुराव जाधव यांच्याजवळील विनापरवाना चोरट्या विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपीकडून देशी दारूच्या ६२४ रुपये किमतीच्या १२ बाटल्या व नगदी १२०० रुपये असा एकूण १८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपीविरोधात पोलीस शिपाई विठ्ठल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.