पूर्णेत मटका बुकीवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST2020-12-14T04:31:29+5:302020-12-14T04:31:29+5:30
पूर्णा शहरातील जुना मोंढा बाजार भागात नारायण रामकिशन कऱ्हाळे (६०) हा लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या चिठ्ठ्या देऊन जुगार खेळवीत ...

पूर्णेत मटका बुकीवर पोलिसांचा छापा
पूर्णा शहरातील जुना मोंढा बाजार भागात नारायण रामकिशन कऱ्हाळे (६०) हा लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या चिठ्ठ्या देऊन जुगार खेळवीत असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता नारायण रामकिशन कऱ्हाळे याच्याजवळून १ हजार ४४० रुपये, एक मोबाईल, असे एकूण २ हजार ४४० रुपयांचे साहित्य व मटक्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
याबाबत कऱ्हाळे याच्याकडे विचारणा केली असता त्याने बंडू आहिरे याच्यासाठी मटका घेत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांकडून एकीकडे अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई केली जात असताना मटका जोरात सुरू आहे. मुख्य बुकी मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्याने मटक्यावर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.