कापूस आणि तुरीच्या पिकातील गांज्याच्या शेतीवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:52 PM2020-11-07T17:52:11+5:302020-11-07T17:53:38+5:30

पथकाने ८ लाख ६० हजार रुपये किंमतीचे १६९.५ किलो वजनाची गांज्याची झाडे जप्त केली.

Police raid cannabis fields in cotton and tur crops in Gangakhed Taluka | कापूस आणि तुरीच्या पिकातील गांज्याच्या शेतीवर पोलिसांची धाड

कापूस आणि तुरीच्या पिकातील गांज्याच्या शेतीवर पोलिसांची धाड

googlenewsNext
ठळक मुद्दे१७० किलो वजनाची झाडे जप्त

गंगाखेड: तालुक्यातील डोंगरजवळा येथे शुकवारी (दि. ६ ) सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कापूस व तुरीच्या पिकातील गांज्याची शेती उद्धवस्त केली. यावेळी पथकाने ८ लाख ६० हजार रुपये किंमतीचा १६९.५ क्विंटल गांजा जप्त केला आहे.

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डोंगरजवळा येथील शेतीत कापूस व तुरीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर सपोनि व्यंकटेश्वर आलेवार, शरद विपट यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ४:४५ वाजेपासून ते ५:३५ वाजे दरम्यान नाथराव देवराव मुंडे ( ७५ ) व दगडीराम देवराव मुंडे (८० ) यांच्या गट क्रमांक ६४, ६५ या शेतावर धाड टाकली. यावेळी कापूस व तुरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. पथकाने ८ लाख ६० हजार रुपये किंमतीचे १६९.५ किलो वजनाची गांज्याची झाडे जप्त केली. पोलिसांनी नाथराव देवराव मुंडे, दगडीराम देवराव मुंडे ( दोघे रा. डोंगरजवळा ता. गंगाखेड ) यांच्या विरुद्ध पिंपळदरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अक्ट १९८५ चे कलम २० (अ), (ब) (१), २२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि राजकुमार पुजारी करत आहेत.

Web Title: Police raid cannabis fields in cotton and tur crops in Gangakhed Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.