सुपर मार्केट येथे पोलिसांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:28+5:302021-05-16T04:16:28+5:30
वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी परिसरात बॅरिकेड लावून वाहने अडवून तपासणी केली. ...

सुपर मार्केट येथे पोलिसांची तपासणी
वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी परिसरात बॅरिकेड लावून वाहने अडवून तपासणी केली. शहरात शनिवारी, रविवारी केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील, असे आदेश प्रशासनाने शुक्रवारी काढले होते. तरी शनिवारी सकाळपासून नवा मोंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांची ये-जा सुरूच होती. संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी ही तपासणी मोहीम अचानक राबविण्यात आली. यामुळे बाहेर विनाकारण फिरण्यासाठी गेलेल्या अनेकांची धांदल उडाली, तसेच पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनधारकांना बाहेर फिरू नये, असे आवाहन केले. परिसरात सुरू असलेली किरकोळ दुकाने बंद करीत घोळक्याने उभ्या असलेल्या नागरिकांना पोलिसांनी परिसरातून हुसकावले. या मोहिमेमुळे बऱ्याच वाहनधारकांनी रस्ता बदलून जाणे पसंत केले. अशी मोहीम शहरात अन्य ठिकाणी राबविणे गरजेचे आहे.