फरार आरोपीस पोलिसांनी पकडले

By Admin | Updated: March 2, 2015 13:39 IST2015-03-02T13:39:28+5:302015-03-02T13:39:28+5:30

जिल्हा कारागृहात एका गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला आरोपी मागील महिन्यात पळून गेल्याची घटना घडली होती. या आरोपीस नानलपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने २८फेब्रुवारी रोजी वसमत येथून पकडले.

Police arrested the absconding accused | फरार आरोपीस पोलिसांनी पकडले

फरार आरोपीस पोलिसांनी पकडले

परभणी :जिल्हा कारागृहात एका गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला आरोपी मागील महिन्यात पळून गेल्याची घटना घडली होती. या आरोपीस नानलपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने २८फेब्रुवारी रोजी वसमत येथून पकडले.
याबाबत माहिती अशी, विजय यशवंत सरोदे (वय ५0) हा आरोपी पोटगी प्रकरणात परभणी येथील जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. फेब्रुवारी महिन्यात कारागृहाच्या परिसरात काम करीत असताना आरोपीने अचानक पळ काढला. यामध्ये आरोपी पळून गेल्याची तक्रार नानलपेठ पोलिसांत नोंदविण्यात आली. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आरोपी वसमत येथील मामा चौकात येणार असल्याचे कळाले. त्यावरुन पथकातील बाळासाहेब तुपसमिंदरे, संजय पुरी यांनी २८फेब्रुवारी रोजी विजय सरोदे यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुधाकर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Web Title: Police arrested the absconding accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.