शिवाजीनगरातील रस्त्यावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:14+5:302021-02-07T04:16:14+5:30
रेल्वेस्थानकावर वाढली प्रवाशांची गर्दी परभणी : शहरातील रेल्वेस्थानकावर आता प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. रेल्वे विभागाने नांदेड- मनमाड या ...

शिवाजीनगरातील रस्त्यावर खड्डे
रेल्वेस्थानकावर वाढली प्रवाशांची गर्दी
परभणी : शहरातील रेल्वेस्थानकावर आता प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. रेल्वे विभागाने नांदेड- मनमाड या मार्गावर गाड्यांची संख्या वाढविली आहे. अजूनही आरक्षण करुनच प्रवास करावा लागत असून, प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. नांदेड, परभणी, सेलू या मार्गावरुन औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, स्थानकावर प्रवासी संख्या वाढू लागली आहे.
गंगाखेड मार्गावरील पुलाची कामे संथगतीने
परभणी : गंगाखेड रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, पुलाची कामे ठप्प आहेत. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. पुलाची कामे रखडल्याने वाहनधारकांना रखडत वाहने चालवावी लागत आहेत. या मार्गावरील वाहतूक लक्षात घेता, रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
ग्रामीण भागातील वातावरण तापले
परभणी : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निमित्ताने वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. ८ ते १२ जानेवारी याकाळात सरपंचांची निवड केली जाणार आहे. यावर्षी सदस्यांच्या निवडीनंतर सरपंचांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सरपंच निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक गावांत आरक्षणाने इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे. त्यामुळे सरपंच निवडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे.
क्रिकेट स्पर्धांची जिल्ह्यात धूम
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दहा महिन्यांपासून क्रिकेटसह इतर खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. मात्र अनलॉकच्या प्रक्रियेत आता सर्व व्यवहार खुले झाले असून, ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. आयपीएलच्या धर्तीवर आता या स्पर्धा आयोजित केल्या जात असून, शहरी व ग्रामीण भागात खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊस तोडणीला ग्रामीण भागात वेग
परभणी : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता अर्ध्यावर आला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील ऊस तोडणीचे वेध लागले आहेत. ग्रामीण भागात ठिकठिकाणी ऊस तोडणी सुरु आहे. आपला ऊस कारखान्यावर लवकरात लवकर जावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी प्रयत्न करीत आहेत. कारखाना प्रशासनाशी संपर्क साधून ऊस घेऊन जाण्याची विनंती केली जात आहे,