विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालवणे कसे परवडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:18 AM2021-07-30T04:18:48+5:302021-07-30T04:18:48+5:30

परभणी : जिल्ह्यात पेट्रोलचे दर ११० रुपयांवर पोहोचले असून, विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोलचे दर महाग झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ...

Petrol more expensive than jet fuel; How can you afford to drive? | विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालवणे कसे परवडणार?

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालवणे कसे परवडणार?

Next

परभणी : जिल्ह्यात पेट्रोलचे दर ११० रुपयांवर पोहोचले असून, विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोलचे दर महाग झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

विमानात भरले जाणारे इंधन पेट्रोलच्या दरापेक्षा स्वस्त आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोलचे दर दररोज वाढतच आहेत. या इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेतील सर्वच वस्तूंचे भाव वाढले असून, सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

पगार कमी, खर्चात वाढ

कोरोनाच्या संसर्गामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. खासगी नोकरी असल्याने नियमित पगार होत नाही. शिवाय पूर्वी मिळत असलेल्या पगारापेक्षाही कमी पगार दिला जात आहे. त्यात दुसरीकडे दरवाढ होत असल्याने महिन्याचा खर्च भागविणे कठीण झाले आहे.

गजानन दुधाटे, परभणी

दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या काळात नोकरी वाचली असली, तरी पगार मात्र वेळेवर होत नाही. त्यातच दुसरीकडे इंधन दरवाढ होत असल्याने महिन्याचा खर्च भागविणे अवघड झाले आहे.

पांडुरंग लांडे

कोरोनामुळे खर्चात भर; ५०० च्या ठिकाणी हजार

कोरोनाच्या संसर्गानंतर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे, त्यात इंधन दरवाढीची भर पडली. परिणामी सर्वच व्यवहार महागले आहेत.

मागील सहा महिन्यांत इंधनाचे दर वाढत आहेत. परिणामी मालवाहतुकीचा खर्च वाढून बाजारपेठेत महागाई वाढली आहे.

पूर्वी ५०० रुपयांमध्ये होणारे काम आता एक हजार रुपयांमध्ये होत आहे. जवळपास दुप्पट खर्च करावा लागत असल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत.

शहरातील पेट्रोल पंपांची संख्या

१२

दररोज लागणारे पेट्रोल

३६०००

शहरातील वाहने

दुचाकी

४०,०००

चारचाकी

१५०००

Web Title: Petrol more expensive than jet fuel; How can you afford to drive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.