४५ वर्षांवरील व्यक्तींना आज दोन्ही डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:46+5:302021-05-15T04:16:46+5:30
शहरात मनपाच्या वतीने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. आता फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच ...

४५ वर्षांवरील व्यक्तींना आज दोन्ही डोस मिळणार
शहरात मनपाच्या वतीने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. आता फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच लस दिली जात आहे. १५ मे रोजी मनपाच्या इनायतनगर, साखला प्लॉट, वर्मानगर, दर्गा रोड, जायकवाडी, शंकरनगर, खंडोबा बाजार, खानापूर येथील मनपाच्या आरोग्य केंद्रांवर तसेच नानलपेठ भागातील बालविद्यामंदिर शाळेतील लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी सकाळी ७ ते १० या वेळेत संबंधित केंद्रांवर मनपा कर्मचाऱ्यांकडून टोकन देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे टोकन घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली. टोकन दिलेल्या व्यक्तींना संबंधित केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत लस देण्यात येणार आहे.