पाणीकरासाठी १०० टक्के तर मालमत्ता करावर ५० टक्के शास्ती शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:30+5:302021-02-14T04:16:30+5:30

शहरात नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर नळ जोडणी घेण्यासाठी नागरिकांना पाणी आणि मालमत्ता कर ...

Penalties for water tax are 100 per cent and property tax is 50 per cent | पाणीकरासाठी १०० टक्के तर मालमत्ता करावर ५० टक्के शास्ती शिथिल

पाणीकरासाठी १०० टक्के तर मालमत्ता करावर ५० टक्के शास्ती शिथिल

शहरात नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर नळ जोडणी घेण्यासाठी नागरिकांना पाणी आणि मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे; मात्र दोन्ही कर एकाच वेळी भरणे अनेक नागरिकांना शक्य नाही. त्यामुळे नळ जोडणी घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याची बाब दिसून आली. या योजनेवर नळ जोडण्याची गती वाढावी, या उद्देशाने शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ३१ मार्चपर्यंत ही सवलत लागू केली होती. यापुढेही एक रकमी कर भरणाऱ्या नागरिकांना नळपट्टीत १०० टक्के आणि मालमत्ता करात ५० टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूट १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीतील ३१ मार्चपर्यंतचा मालमत्ता कर व पाणी पट्टी भरणा केल्यास लागू राहणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे.

Web Title: Penalties for water tax are 100 per cent and property tax is 50 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.