शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
2
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'अत्यंत दळभद्री...'; नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावरुन संतापले संजय राऊत
6
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
7
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
8
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
9
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
10
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
11
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
12
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
14
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
15
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
16
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
17
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
18
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
19
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
20
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

पाथरीतील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा; ५० कोटींचा निधी वितरित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 1:39 PM

'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकासासाठी ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे

-विठ्ठल भिसेपाथरी (परभणी ): साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी येथील 'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  ९१ कोटी ८० लाख रुपये निधीस  मान्यता दिली होती. आता शासनाकडून पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांचा विकास आराखडा निधी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांनी १३ फेब्रुवारी रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाथरी  ही साईबाबा यांची जन्मभूमी असून येथे  साईबाबा यांचे भव्य मंदिर उभारणी करण्यात आली आहे. मात्र, साईबाबा तीर्थक्षेत्र विकास कामापासून आजपर्यंत वंचित राहिले. मंदिराकडे जाण्यास साधा रस्ताही नसल्याने साई भक्तांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. २०१६ साली बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी पाथरी येथे भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने साईबाबा जन्मभूमीसाठी विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली. पुढे रामनाथ कोविंद  राष्ट्रपती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगर परिषदकडून विकास आराखडा मागवून घेतला. मात्र, युती शासनाच्या पाच वर्षे काळात आणि त्यानंतर महा विकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षे कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपयांचा आरखड्याची घोषणा केली होती. मात्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीस मुहूर्तच सापडला  नव्हता.

दरम्यान, गतवर्षी राज्यात सत्तांतर झाले शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री  शिंदे यांचे निकटवर्तीय  शिवसेना अल्पसंख्याक  प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाठपुरावा सुरू केला. छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात आली. तद्नंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासनाने  १३ फेब्रुवारी रोजी निधी वितरण बाबत आदेश काढले आहेत. जमिन अधिग्रहण साठी ३९ कोटी रुपये तर ११ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सदरील निधी जिल्हाधिकारी परभणी यांना वर्ग करण्यात आला आहे.   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुर करून निधी उपलब्ध करून दिल्याने आता खऱ्या अर्थाने साईभक्ताचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे.कामाचा पाठपुरावा केला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सईद खान यांनी लोकमतला बोलताना दिली.

टॅग्स :saibabaसाईबाबाparabhaniपरभणी