कृषी शिक्षण धोरण निश्चिती समितीत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:46+5:302021-05-12T04:17:46+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या वतीने राज्यातील चारही ...

कृषी शिक्षण धोरण निश्चिती समितीत पाटील
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठामध्ये राबविण्यात येत असलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्चित करण्यासाठी ६ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून राहुरीचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांची तर सदस्यपदी परभणी येथील माजी अधिष्ठाता डॉ. विलास पाटील, दापोली येथील माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर, डॉ. सतीश नारखेडे, अकोला येथील डॉ. डी. एल. साळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल २ महिन्यांत राज्य शासनाला देणार आहे.