शिवसेनेच्या बैठकीत परभणीकरांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:45+5:302021-09-02T04:38:45+5:30
येथील बी.रघुनाथ सभागृहात ३१ ऑगस्ट रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी खा. जाधव बोलत होते. या बैठकीस आमदार ...

शिवसेनेच्या बैठकीत परभणीकरांना साद
येथील बी.रघुनाथ सभागृहात ३१ ऑगस्ट रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी खा. जाधव बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोपानराव आवचार, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, माणिकराव आव्हाड, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी अर्जून सामाले, पंढरीनाथ घुले, नंदू अवचार, अतुल सरोदे, ज्ञानेश्वर पवार, संजय सारणीकर अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, रवी पतंगे, जि. प. सदस्य जनार्दन सोनवणे, गजानन देशमुख, दिनेश बोबडे, प्रल्हाद लाड, गुणाजी आवकाळे आदींची उपस्थिती होती.
जेव्हा जेव्हा परभणीकरांनी एकजुटीने आंदोलन केले तेव्हा तेव्हा यश मिळाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लढाईतही निश्चितच यश मिळेल, असा विश्वास खा.बंडू जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत परभणीला शासनाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्यावेच लागेल. कारण परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अत्यंत गरज आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनात आपण तन-मन-धनाने परभणीकरांसोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ.विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, संजय गाडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीस शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.