परभणीत औजारे प्रदर्शन; शेती यांत्रिकीकरणाने सुधारेल आर्थिक धोरण- अशोक ढवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:36 AM2019-03-03T00:36:07+5:302019-03-03T00:36:31+5:30

कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण मजबूत होईल. त्याचबरोबर उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण सुधारण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.अशोक ढवन यांनी केले.

Parbhaniat Ojare performing; Agriculture Mechanics Improve economic policy: Ashok Dhawan | परभणीत औजारे प्रदर्शन; शेती यांत्रिकीकरणाने सुधारेल आर्थिक धोरण- अशोक ढवण

परभणीत औजारे प्रदर्शन; शेती यांत्रिकीकरणाने सुधारेल आर्थिक धोरण- अशोक ढवण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण मजबूत होईल. त्याचबरोबर उद्योजक, शेतकरी व कृषी अभियंते यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण सुधारण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.अशोक ढवन यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत पशूशक्तीचा योग्य वापर या योजनेमार्फत कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्त ऊर्जा उद्यानामध्ये २८ फेब्रुवारी रोजी सुधारित कृषी औजारे, अपारंपारिक ऊर्जा साधनांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिकांचे उद्घाटन कुलगुरु डॉ.ढवन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ.प्रदीप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ.अशोक कडाळे, प्रकल्प संचालक के.आर. सराफ, सहयोगी अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले, प्रा.डॉ.यु.एम. खोडके, तालुका कृषी अधिकारी पी.बी. बनसावडे यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील ७०० ते ८०० शेतकºयांनी सहभाग नोंदविला. या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर चलित, सौर चलित, सुधारित बैल चलित औजारांचे प्रदर्शन व प्रात्याक्षिकाचे सादरीकरण करुन दाखविण्यात आले. यावेळी डॉ.सी.बी. लटपटे, डॉ.ए.के. गोरे, डॉ.डी.एस. चव्हाण, डॉ.आर.टी. रामटेके यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. प्रा.स्मिता सोलंकी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.डी.डी. टेकाळे यांनी आभार मानले.

Web Title: Parbhaniat Ojare performing; Agriculture Mechanics Improve economic policy: Ashok Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.