परभणी: अतिवृष्टीने बाधित पिकांची चुकीची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:04 AM2019-11-28T00:04:42+5:302019-11-28T00:05:23+5:30

कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

Parbhani: Wrong percentage of crops affected by rainfall | परभणी: अतिवृष्टीने बाधित पिकांची चुकीची टक्केवारी

परभणी: अतिवृष्टीने बाधित पिकांची चुकीची टक्केवारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़
परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन, कापूस यासह इतर बागायती पिकांचे मोठे नुकसान केले आहे़ प्रशासनाकडून तहसील कार्यालय, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती प्रशासनाकडून विविध पथकांनी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून प्रशासनाला अहवाल सादर केला़ पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे पावसाने मोठे नुकसान झाले असताना पंचनामे करणाºया अधिकाºयाने चुकीचे पंचनामे केले़ प्रत्यक्षात पूर्ण नुकसान झाले असतानाही केवळ १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनास सादर केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे़
पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही टक्केवारी कमी दाखवल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे पिकांचे पुन्हा पंचनामे करून सदरील कामचुकार दोषी ग्रामसेवकांस निलंबन करावे़ कामचुकारपणा करणाºयांवर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबिय गुराढोरांसह उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़
कंठेश्वर येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनावर शहरप्रमुख मुंजा कदम, रमेश ठाकूर, नरहरी कदम, हरिभाऊ कदम, बाबुराव कदम, संतोबा कदम, नागनाथ कदम, भानुदास कदम, गोपाळ कदम, शिवाजी कदम, मोहन कदम, शिवाजी कदम, गंगाबाई कदम, सखूबाई कदम आदी शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत़
कृषी कार्यालयात अधिकारीच नाही
४अतिवृष्टीने बाधीत पिकांच्या नुकसानीची चुकीची टक्केवारी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंठेश्वर येथील शेकडो शेतकरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या बंद कक्षाला निवेदन देत रोष व्यक्त केला.

Web Title: Parbhani: Wrong percentage of crops affected by rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.