परभणी : आठ कोटींची कामे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:41 IST2018-04-14T00:41:22+5:302018-04-14T00:41:22+5:30
जिल्ह्यातील प्रलंबित असणाऱ्या कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्ह्याला ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून या निधीतून होणाºया कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित १२०० कृषीपंपधारकांना यातून वीज जोडणी मिळणार आहे.

परभणी : आठ कोटींची कामे सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील प्रलंबित असणाऱ्या कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जिल्ह्याला ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून या निधीतून होणाºया कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित १२०० कृषीपंपधारकांना यातून वीज जोडणी मिळणार आहे.
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणाºया जवळपास २ लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यामध्ये ९२ हजार कृषीपंपधारकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ हजार कृषीपंपधारकांनी वीज जोडणीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन महावितरणकडे वीज जोडणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. परंतु, एक-एका कृषीपंपधारकाने ६ हजार रुपयांचे कोटेशन भरुनही त्यांना वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज जोडणी मिळत नव्हती. त्यामुळे कृषीपंपधारक संतापले होते. त्यानंतर खा.संजय जाधव यांनी प्रलंबित कृषीपंपधारकांना तत्काळ वीज जोडण्या देण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी महावितरणला टाळे ठोक आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने जिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंपधारकांच्या वीज जोडण्यांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी प्राप्त झाल्यानंतर महावितरणच्या नांदेड परिमंडळातून या कामाच्या निविदा काढण्यात आल्या. त्यानुसार १३ एप्रिलपर्यंत १ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत उर्वरित रक्कमेच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डिसेंबर २०१६ पर्यंत ज्या कृषीपंपधारकांनी महावितरणकडे ६ हजार रुपयांचे कोटेशन भरुन वीज जोडणीसाठी अर्ज केले होते. त्या शेतकºयांना या निधीमधून वीज जोडणी मिळणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केबल टाकून आपल्या कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत ठेवणाºया कृषीपंपधारक शेतकºयांना महावितरणकडून वीज जोडणी मिळणार आहे. त्यामुळे कृषीपंपधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतील शेतकरी वाºयावर
प्रत्येक शेतकºयाला कृषीपंपासाठी वीज पुरवठा मिळावा, या उद्दात हेतुने २०१२ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातील ८ हजार ३७३ शेतकºयांनी तब्बल ८ कोटी रुपयांचे कोटेशन भरुन कृषीपंपाची वीज जोडणी मिळावी, यासाठी अर्ज केले. परंतु, सहा वर्षापासून हे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये गंगाखेड उपविभागातील ८०८, पूर्णा ५३७, परभणी ग्रामीण ६५२, पाथरी १७१६, सेलू १६०५, जिंतूर १५८५, सोनपेठ ५१३, पालम ५४६, मानवत ४११ अशा ८ हजार ३७३ शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी कृषीपंपधारकांतून होत आहे.
खासदारांच्या आंदोलनाला मिळाले यश
खा.संजय जाधव यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रलंबित शेतकºयांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, या मागणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाचा धसका घेत ८ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला देण्यात आला. या निधीतून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या जवळपास १२०० कृषीपंपधारकांना वीज जोडणी मिळणार आहे. त्यामुळे खा.संजय जाधव यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. दरम्यान, जानेवारी २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीतील कृषीपंपधारक व महावितरण आपल्या दारी योजनेतील तब्बल साडेआठ हजार शेतकºयांना वीज जोडणी देण्यासाठी खा.संजय जाधव यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी कृषीपंपधारकांतून होत आहे.