शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : टँकरच्या सहाय्याने झाडांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:41 IST

तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंत शाळा आहे़ या शाळेचा परिसर मोठा असल्याने शिक्षक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले़ सध्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे़ वाणीसंगम येथेही पाण्याची वाणवा आहे़ जिल्हा परिषद शाळेतील प्रांगणात लावलेली झाडे पाण्याअभावी सुकून जात असल्याचे शिक्षकांसह शालेय व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आले़ तेव्हा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपान झिर्पे यांनी पुढाकार घेत आपल्या जवळील ट्रॅक्टरमध्ये शेतातील पाणी आणून शाळा परिसरातील झाडांना पाणी देणे सुरु केले आहे़ शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी घेतलेल्या पुढाकाराचे गाव परिसरात कौतुक होत आहे़ त्याचबरोबर दुष्काळात झाडांना पाणी मिळत असल्याने झाडे हिरवी झाली आहेत़स्वखर्चातून पाणीपुरवठा४वाणीसंगम व गाव परिसरातील जलस्त्रोत आटले आहेत़ त्याचबरोबर हातपंपही कोरडेठाक पडल्याने गावात पाणीटंचाई आहे़४उन्हाच्या तीव्रतेने शाळा परिसरातील झाडे सुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या झाडांना पाणी आणायचे कोठून असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर उभा राहिला़४शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झिरपे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून गाव परिसरातील शेतामधून टँकरच्या सहाय्याने पाणी आणून या झाडांना देण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Parabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणीparabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणी