शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: गोदापात्रातच शोधावं लागतंय पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:10 IST

तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यात एरव्ही पावसाळ्यात काठोकाठ भरून वाहनारी गोदावरी नदी यावर्षी मात्र कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांची बकाल अवस्था झाली असून जनावरे व चारा पिके जगविण्यासाठी गोदापात्रातच खड्डे खोदून पाणी शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पालम तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. याच नदीवर तालुक्यातील डिग्रस येथे बंधारा बांधण्यात आला आहे. आठ महिने या बंधाºयात काठोकाठ तुडूंब पाणी भरलेले पहावयास मिळते; परंतु, यावर्षी जिल्हा प्रशासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे गोदावरीच्या पात्रात केवळ गाळच शिल्लक राहिल्याने जेमतेम पंधरा दिवस पाणी कसेबसे शिल्लक होते. जानेवारी महिना उजाडताच गोदावरी नदीच्या पात्रातील पूर्णत: आटत गेल्याने गोदावरीचे वाळवंट झाले आहे. गोदाकाठच्या गावांना नदी असूनही पिण्यासाठी शेतशिवारातील पाणी स्त्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. गोदावरीच्या पात्रात लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकलेली आहे. पाण्याअभावी या पाईपलाईन बंद पडलेल्या आहेत.शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व जनावरांसाठी थोड्याफार प्रमाणात हिरवा चारा मिळावा, याकरीता शेतकºयांनी जागोजागी गोदावरी नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पाडलेले आहेत. २४ तासांत या खड्यांना तासभर मोटार चालतील एवढे पाणी येत आहे. रात्रंदिवस जागून या खड्यातून पाणी शेतापर्यंत नेण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.डिग्रसचे पाणी लवकर सोडून देण्यात आल्याने गोदावरीचे पात्र पूर्णत: वाळवंट झालेले आहे. परिणामी गोदाकाठ भागात दुष्काळाची दाहकता वाढत असून शेतकºयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.जिल्हा प्रशासन : बघ्याची भूमिका४पालम तालुक्यातील बहुतांश गावे ही गोदाकाठावर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांना उन्हाळ्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो; परंतु, गोदाकाठावर असलेल्या पालम तालुक्यातील गावांना मात्र दुष्काळाची साधी जाणीवही होत नाही. मात्र यावर्षी पालम तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान राहिले. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील गावे डिग्रस बंधाºयातील पाण्याकडे अपेक्षेने पाहत होते.४या बंधाºयात गतवर्षीच्या पावसाळामुळे मूबलक पाणीसाठा होता. त्यामुळे यावर्षीही आपल्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, असे स्वप्न उराशी बाळगून डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ होते; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फेरत डिसेंबर महिन्यातच नांदेडला पाणी सोडून हा बंधारा खाली केला. कोणताही विचार, विरोध न करता पाणी सोङण्याचा सोपस्कार पाटबंधारे विभागाने पार पाडला.४ शेतकºयांचा व लाभक्षेत्रातील ग्रामस्थांचा विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळेच गोदा नदीकाठावरील व डिग्रस बंधाºयाच्या लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनाही नदीपात्रातच पाणी शोधावे लागत असल्याची वेळ आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीriverनदी