शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

परभणी : खळी पूल परिसरात तीन मीटरपर्यंत आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:46 PM

जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी २५ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले असून मुळी बंधाऱ्यातून सुमारे ४ हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाण्याच्या या विसर्गामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यानचा कच्चा रस्ता वाहून गेला आहे. हे पाणी सरळ डिग्रसच्या दिशेने निघाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी २५ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहर परिसरात दाखल झाले असून मुळी बंधाऱ्यातून सुमारे ४ हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग होत आहे. पाण्याच्या या विसर्गामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यानचा कच्चा रस्ता वाहून गेला आहे. हे पाणी सरळ डिग्रसच्या दिशेने निघाले आहे.तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यानंतर या नदीपात्रात पाणी वाहते झाले नाही. गतवर्षी आॅगस्ट- सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे गंगाखेड ते धारखेड दरम्यान नगर पालिका प्रशासनाने बांधलेला छोटा बंधारा वाहून गेला होता. त्यानंतर या ठिकाणी मातीचा भराव टाकून कच्चा बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयातील पाणी शहरासाठी वापरले जात होते. २४ आॅगस्ट रोजी खडका बंधाºयातून सोडलेले पाणी रात्री १० वाजेच्या सुमारास मुळी बंधाºयातून गंगाखेडच्या दिशेने निघाले. बंधाºयातून ४ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु झाल्याने पात्रातील खड्डे भरल्यानंतर रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमाराह शहराजवळील धारखेड ते गंगाखेड दरम्यान बांधलेल्या मातीच्या बंधाºयात हे पाणी दाखल झाले. मात्र पाण्याच्या वेगामुळे या बंधाºयाला भगदाड पडले असून पाण्याला मोकळी वाट मिळाली आहे. माती बंधाºयावरुन धारखेड, मुळी, नागठाणा या ग्रामस्थांना शहर गाठता येत होते; परंतु, आता मात्र रेल्वे पुलावरुन ३ कि.मी. अंतराचा फेरा घेऊन ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठावे लागत आहे.पूर्णा तालुक्यातील गावांना प्रतीक्षाच४जायकवाडी प्रकल्पातून निघालेले पाणी परभणी जिल्ह्यात पोहचले असले तरी पूर्णा तालुक्यातील गावांना अजूनही या पाण्याची प्रतीक्षा आहे. पाथरी, गंगाखेड व पालम तालुक्याचा प्रवास करुन हे पाणी आता पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे असलेल्या डिग्रस बंधाºयात येणार आहे.४पाण्याची गती कमी असल्याने सोमवारपर्यंत बंधाºयात पाणी पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. तर बंधारा भरण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार असून पुढे हे पाणी नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पात सोडतात की नाही, याबाबत शंका आहे. गोदावरीच्या पाण्याची तालुकावासियांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी