शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

परभणी : सोमवारपासून मतदार नोंदणी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:02 AM

आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील सुधारणांसाठी १५ जुलैपासून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे़ या अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव वगळणे आणि सुधारणा करण्याची कामे केली जाणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील सुधारणांसाठी १५ जुलैपासून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे़ या अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव वगळणे आणि सुधारणा करण्याची कामे केली जाणार आहेत़जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत़ १५ ते ३० जुलै या काळात मतदारांकडून या याद्यांवर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत़ २०, २१, २७ आणि २८ जुलै रोजी विशेष मोहीम घेतली जाणार असून, या दिवशी बीएलओ आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत़ त्यांच्यामार्फत नवीन नाव नोंदणी, दुबार नाव वगळणे आदी कामे केली जातील़ १९ आॅगस्ट रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे़ १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर हा कार्यक्रम राबविला जाणार असून, १ जानेवारी २०१९ रोजी ज्यांची वयाची १८ वर्ष पूर्ण असतील अशांना मतदार यादीत नाव नोंदविता येईल़ आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी ही अखेरची संधी असून जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी केले आहे़ सर्व राजकीय पक्षांनीही मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी नियुक्त करावेत, मतदार याद्या अद्यायवत करण्यासाठी बीएलओंशी समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़ अती महत्त्वाच्या व्यक्तींची नावे चुकीने वगळली जाऊ नयेत, यासाठी डेटाबेसमध्ये चिन्हांकन केले जाणार आहे़ तसेच दिव्यांग व्यक्तींच्या नावालाही चिन्हांकीत केले जाणार आहे़ जिल्हातील ५० प्रकरणांची पडताळणी जिल्हाधिकारी स्वत: करणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019