परभणी :वरपूडकर यांची अध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:21 IST2019-09-21T00:20:37+5:302019-09-21T00:21:37+5:30
तालुका खरेदी- विक्री संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांची तर उपाध्यक्षपदी शंकरराव बुचाले यांची निवड झाली आहे.

परभणी :वरपूडकर यांची अध्यक्षपदी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुका खरेदी- विक्री संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांची तर उपाध्यक्षपदी शंकरराव बुचाले यांची निवड झाली आहे.
परभणी तालुका खरेदी- विक्री संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीनंतर खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी २० सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीत माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांची अध्यक्षपदी तर त्र्यंबकराव बुचाले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेसाठी मुकूंद देशमुख व निलवर्ण यांचे सहकार्य लाभले.