शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलाढाली कृषी हंगामावर अवलंबून आहेत़ जिल्ह्यात खरीप आणि रबी या दोन हंगामात पिके घेतली जातात़ खरीप हंगामातील पिके मोसमी पावसावर अवलंबून असतात तर रबी हंगामातील पिकांना जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतात़ जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाही झाला आहे़ पाथरी तालुक्यातील वरखेड येथून डाव्या कालव्याला सुरुवात होते़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमध्ये डाव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळते़ तर सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांना उजव्या कालव्यातून जायकवाडीचे पाणी उपलब्ध होते़ जायकवाडी प्रकल्प हा परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे़ जिल्ह्यातील रबी हंगामातील पिकांसाठी हमखास जायकवाडी प्रकल्पातून पाणी घेतले जात़े़ मात्र मागील सहा वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा असल्याने जायकवाडी प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला नव्हता़ परिणामी परभणी जिल्ह्यातील रबी हंगामात धोक्यात आला होता़ ५ ते ६ वर्षांपर्यंत जिल्ह्याला पाणी मिळाले नाही़मागील वर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के पाऊस कमी झाला असला तरी जायकवाडी प्रकल्प मात्र १०० टक्के भरला़ त्यामुळे परभणी जिल्ह्याला या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या वितरिका, उपवितरिका आणि चाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिकांना पाणी उपलब्ध होते़ यावर्षी प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने कालव्यांना आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी जोर धरत होती़ या मागणीनुसार पाणी पाळयांचे नियोजन करण्यात आले़ रबी हंगामामध्ये ४ पाणी पाळया देण्यात आल्या आणि त्याचा फायदा रबीच्या पिकांना झाला आहे़ जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर ४८ हजार ५०० हेक्टर जमिनीवर सिंचन झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांनी दिली़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० हजार हेक्टर सिंचन वाढविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ रबी हंगामासाठी प्रथमच पूर्ण क्षमतेने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गहू, हरभरा़, ज्वारी, कापूस या पिकांना लाभ झाला़ जायकवाडीच्या पाण्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी पेरण्यांचे नियोजन केले होते़ अपेक्षेप्रमाणे प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे़उन्हाळी हंगामातही मिळाले पाणीजायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठीही यावर्षी पाणी उपलब्ध झाले आहे़ पाटबंधारे विभागाने उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी तीन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या आहेत़ येत्या काही दिवसांत शेवटची पाणी पाळी देखील जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे़ उन्हाळी हंगामात सर्वसाधारपणे १० हजार हेक्टरपर्यंतच सिंचन होते़ परंतु, पाटबंधारे विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिंचनात वाढ झाली असून, उन्हाळी हंगामातील पिकांसाठी २५ हजार हेक्टरवर जायकवाडीचे पाणी उपलब्ध झाले आहे़ हे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण