परभणी : नगरपालिका सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:40 AM2019-01-22T00:40:55+5:302019-01-22T00:41:29+5:30

जिल्ह्यातील पाथरी, सेलू, सोनपेठ व जिंतूर या चार नगरपालिकांच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या़ विशेष म्हणजे, या चारही पालिकेतील सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत़

Parbhani: Unanimous selection of municipal chairmen | परभणी : नगरपालिका सभापतींची बिनविरोध निवड

परभणी : नगरपालिका सभापतींची बिनविरोध निवड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील पाथरी, सेलू, सोनपेठ व जिंतूर या चार नगरपालिकांच्या स्थायी व विविध विषय समित्यांच्या निवडणुका सोमवारी पार पडल्या़ विशेष म्हणजे, या चारही पालिकेतील सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत़
महिला व बालकल्याण सभापतीपदी नलिनी चिमणगुंडे
सोनपेठ- नगरपालिकेच्या विषय समित्या गठीत झाल्या असून, महिला व बालकल्याण सभापतीपदी नलिनी विनोद चिमणगुंडे, उपसभापतीपदी सैदाबी जहीर राज यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा जिजाबाई चंद्रकांत राठोड यांची निवड झाली आहे़
सोनपेठ नगरपालिकेच्या विषय समित्या गठीत करण्यासाठी २१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार जीवराज डापकर हे होते़ विषय समितीच्या निवडीत सदस्यपदी आशाबाई घुगे, शेख मेराजबी युनूस, सुवर्णा सुनील बर्वे यांची निवड करण्यात आली़ त्याचबरोबर स्थायी समितीच्या सदस्यपदी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, पदसिद्ध सदस्य नलिनी चिमणगुंडे, रमाकांत राठोड, अ‍ॅड़ श्रीकांत भोसले यांच्या निवडी करण्यात आली़ या विशेष सभेला १९ सदस्य उपस्थित होते़ सहायक पीठासीन अधिकारी म्हणून पाथरी ऩप़चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, कार्यालयीन अधीक्षक विश्वंभर सोनखेडकर, छगन मिसाळ यांनी काम पाहिले़
सेलूत स्थायी व विषय समित्या बिनविरोध
सेलू-नगरपालिकेच्या स्थायी व विविध विषय समित्यांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली़ या निवडीसाठी ऩप़च्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले़
महिला व बालकल्याण सभापतीपदी शेख अख्तर बेगम म़ अय्युब तर बांधकाम सभापती म्हणून शेख रहीम यांची बिनविरोध निवड झाली़ त्याचबरोबर पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी शेख कासीम तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यसमितीच्या सभापतीपदी विठ्ठल काळबांडे यांची बिनविरोध निवड झाली़ स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे व विषय समितीचे सर्व सदस्य त्याचबरोबर वहीद अन्सारी, गौतम धापसे, हेमंतराव आडळकर यांचा सदस्य म्हणून निवड झाली़ यावेळी मुख्याधिकारी देविदास जाधव यांची उपस्थिती होती़
चिठ्ठी काढून सभापतीची निवड
गंगाखेड- गंगाखेड नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ पाणीपुरवठा समिती सभापतीपदासाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून सभापतीपदाची निवड करण्यात आली़
सार्वजनिक बांधकाम समिती सभापदीपदी अजीज खान इब्राहीम खान पठाण, स्वच्छता, वैद्यकीय शेख इस्माईल, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी विमलबाई घोबाळे, शिक्षण समिती सभापतीपदी सत्यपाल साळवे, स्थायी समिती सदस्यपदी शैलाबाई ओझा, नागनाथ कासले, अ‍ॅड़ सय्यद अकबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सीमाताई राखे व अपक्ष नगरसेविका तलत शेख मुस्तफा या दोघांनाही समान ३-३ मते मिळाल्याने दोघांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली़ यात सीमाताई राखे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली़ यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून विश्वंभर गावंडे, सीईओ नानासाहेब कामठे आदी उपस्थित होते़
बांधकाम सभापतीपदी श्यामराव मते
४जिंतूर- नगरपालिकेच्या विविध सभापतीपदी पदाच्या व स्थायी समितीच्या निवडीसाठी नगरपालिकेच्या सभागृहात विशेष बैठक बोलावण्यात आली़ या बैठकीत बांधकाम सभापतीपदी श्यामराव मते यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
४पाणीपुरवठा सभापतीपदी आशाताई अंभोरे यांची निवड करण्यात आली़ महिला व बालकल्याण सभापतीपदी शेख फरजाना बेगम अहेमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ स्थायी समितीची निवडणूकही बिनविरोध पार पडली़ तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या़
४यावेळी नगराध्यक्षा साबिया बेगम फारुखी, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, ऩप़ सदस्य कपिल फारुखी, मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, दत्ता काळे, दलमीर पठाण, शोएब जानीमिया, फेरोज कुरेशी, उस्मान पठाण, रामराव उबाळे, शेख इस्माईल, अहमद बागवान आदींची उपस्थिती होती़
पाथरी नगरपालिकेतही बिनविरोध निवडी
पाथरी- नगरपालिकेची विषय समिती स्थापन करण्यासाठी २१ जानेवारी रोजी बोलावलेल्या बैठकीत विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली़ पालिकेच्या सभागृहात दुपारी १ वाजता पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व्ही़एल़ कोळी, सहायक अधिकारी तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत विषय समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली़ सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी हासेब खान तैजीब खान यांची तर स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी शेख इरफान शेख उस्मान, महिला व बालकल्याण सभापतीपदी गुफा किरण भाले पाटील यांची तर पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापतीपदी हन्नानखान दुर्राणी यांची निवड करण्यात आली़ यावेळी गटनेता जुनेद खान दुर्राणी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़
बांधकाम सभापतीपदी उत्तम खंदारे
पूर्णा- पालिकेच्या स्थायी समिती व विषय समितीच्या २१ जानेवारी रोजी निवडी करण्यात आल्या़ यामध्ये बांधकाम सभापतीपदी उत्तम खंदारे यांची निवड करण्यात आली़ पूर्णा पालिका सभागृहात तहसीलदार श्याम मदनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते़ या सभेत पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीच्या सभापतीपदी शेख मन्नाबी शेख बशीर, शिक्षण सभापतीपदी विशाल कदम, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी लता खराटे, महिला व बालकल्याण सभापतीपदी कुरेश महेमुदा बेगम महेबूब यांची तर स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांची निवड करण्यात आली़ यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नंदू चावरे, शंकर काळे, मोहन एंगडे, सय्यद इम्रान यांची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Unanimous selection of municipal chairmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.