परभणी : अडीच क्विंटल प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:30 IST2019-01-12T00:29:54+5:302019-01-12T00:30:37+5:30
शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परभणी : अडीच क्विंटल प्लास्टिक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या असून संबंधित दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
परभणी शहरातील कच्छी बाजार भागात मनपा उपायुक्त विद्या गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माथेकर, विनय ठाकूर, युवराज साबळे, कदम यांच्या पथकाने शहरातील इतर किरकोळ विक्रेत्यांना प्लास्टिक बॅगचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकून प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत अडीच क्विंटल प्लास्टिक कॅरिबॅग जप्त केल्या. त्यानंतर सदरील दुकानदाराकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मनपाच्या पथकाने गुरुवारीही याच भागात कारवाई करुन दोन व्यापाºयाकडून ३५ किलो प्लास्टिक कॅरिबॅग जप्त केल्या होत्या. या व्यापाºयाकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.