परभणी : मोरेगावातील उपद्रवी माकड जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:27 IST2019-12-24T00:27:33+5:302019-12-24T00:27:49+5:30
दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़

परभणी : मोरेगावातील उपद्रवी माकड जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): दीड महिन्यांपासून मोरेगाव येथील ग्रामस्थांना हैराण करणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले असून, ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़
मोरेगाव शिवारात मागील दीड महिन्यापासून एका माकडाने ग्रामस्थांना हैराण केले होते़ रस्त्यावरून वाहतूक करणाºया ग्रामस्थांवर हल्ला करणे, शेतात काम करणाºया शेतकऱ्यांना चावा घेवून जखमी करणे, या उपद्रवामुळे अख्खे गाव दहशतीखाली वावरत होते़
आतापर्यंत १२ ते १५ जणांना या माकडाने जखमी केले़ त्यामुळे या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाºयांकडे केली होती़ त्यानुसार वनपाल गणेश घुगे, राजू कुलकर्णी व ग्रामस्थांनी सोमवारी मोरेगाव शिवारात सापळा लावला़ शेंगा टाकून माकडाला पिंजºयात अडकविण्याचा प्रयत्न केला; परंतु, माकड एका मंदिरात घुसले़
त्याचवेळी मंदिराचे दरवाजे लावून पिंजरा दरवाजासमोर लावण्यात आला़ तसेच मोकळ्या जागेत पलंग बांधून माकडाला पिंजºयात अडकविण्याचे प्रयत्न करण्यात आले़ त्यात यश आले़ हे माकड पिंजºयात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़