परभणी : पालम येथे कंटेनर उलटल्याने वाहतूक झाली विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:15 IST2017-12-24T00:15:02+5:302017-12-24T00:15:14+5:30
शहरातील लोहा राज्य रस्त्यावर रिकामा कंटेनर उलटल्याची घटना २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़

परभणी : पालम येथे कंटेनर उलटल्याने वाहतूक झाली विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : शहरातील लोहा राज्य रस्त्यावर रिकामा कंटेनर उलटल्याची घटना २२ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली़ यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़
गंगाखेड ते लोहा या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १६ वर पालम शहरात दुभाजक रस्ता आहे़ या दुभाजकास रेडीअम बसविण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी हा दुभाजक वाहनचालकांना दिसत नाही़ यामुळे रात्रीच्या वेळी वाहने दुभाजकावर आदळण्याचे प्रकार घडत आहेत़ २२ डिसेंबर रोजी रात्री एम़एच़२५/ यु़१४७९ या क्रमांकाचा रिकामा कंटेनर दुभाजकावर धडकला़ यामध्ये १०० फूट घासत जावून समोर रस्त्यावर उलटला़ शनिवारी दुपारपर्यंत रस्त्यावरील कंटेनर हटविण्यात आला नव्हता़ त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता़