बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागात परभणी ‘टॉप’वर
By Admin | Updated: May 30, 2017 15:13 IST2017-05-30T15:13:24+5:302017-05-30T15:13:24+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात टॉपवर राहिला असून, जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला आहे.

बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागात परभणी ‘टॉप’वर
>ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात टॉपवर राहिला असून, जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा मंगळवारी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये औरंगाबाद विभागातून परभणी हा जिल्हा सर्वप्रथम आला आहे. जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला आहे.
परभणीनंतर दुस-या क्रमांकावर बीड जिल्हा राहिला असून, या जिल्ह्याचा ९०.४९ टक्के निकाल लागला आहे.
तिसरा क्रमांक औरंगाबाद जिल्ह्याचा असून, या जिल्ह्याचा ८९.७६ टक्के निकाल लागला आहे़ हिंगोली जिल्ह्याचा ८९.६२ टक्के निकाल लागला असून, सर्वात शेवटच्या क्रमांकावर जालना जिल्हा असून, या जिल्ह्याचा ८८.४९ टक्के निकाल लागला आहे.
परभणी जिल्ह्यातील २२ हजार ११० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये २ हजार ७९७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, १० हजार ७६१ विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
६ हजार २८९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, १३७ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा ९५.८० टक्के निकाल लागला आहे. या शाखेसाठी ९ हजार ५३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये १२०९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ४ हजार ६९७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ हजार १४६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६५ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ जिल्ह्याचा कला शाखेचा ८५.१८ टक्के निकाल लागला असून, या शाखेतून परीक्षेसाठी ९ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे नोंदणी केली होती.
त्यापैकी ९ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ११७६ विशेष प्राविण्यासह, ४ हजार ९४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २ हजार ३१६ द्वितीय श्रेणीत तर ४७ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा जिल्ह्याचा ९३.४९ टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी २ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व सर्वच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ त्यामध्ये १ हजार ९५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये ३९७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ९२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २४ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा जिल्ह्याचा ८७.१७ टक्के निकाल लागला आहे़ या अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातील ५०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ ४९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १९६ प्रथमश्रेणीत, २२३ द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
पुरवणी परीक्षेचा ५० टक्के निकाल
बारावीचा पुरवणी परीक्षेचा जिल्ह्याचा ५० टक्के निकाल लागला असून, या परीक्षेसाठी ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ ४७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ त्यामध्ये २ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १६६ विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत़ या परीक्षेचा विज्ञान शाखेचा ६६.१३ टक्के, कला शाखेचा ४३.०५ टक्के, वाणिज्य शाखेचा ५४.२९ टक्के तर किमान कौशल्यावर आधारित शाखेचा ४५.८३ टक्के निकाल लागला आहे.
जिंतूर तालुका जिल्ह्यात प्रथम
जिंतूर तालुक्याचा बारावीचा ९३.५४ टक्के निकाल लागला असून, हा तालुका जिल्ह्यात पहिला आला आहे. त्या खालोखाल सेलू तालुका दुसºया क्रमांकावर असून, या तालुक्याचा ९२.८८ टक्के निकाल लागला आहे़ तिसºया क्रमांकावर परभणी तालुका असून, या तालुक्याचा ९२.०४ टक्के निकाल लागला आहे़ याशिवाय पूर्णा तालुक्याचा ८९.८३ टक्के, मानवत तालुक्याचा ८८.५७ टक्के, सोनपेठ तालुक्याचा ८९.३५ टक्के, गंगाखेड तालुक्यात ८७.६२ टक्के, पालम तालुक्याचा ८७.२२ टक्के तर पाथरी तालुक्याचा ८१.५८ टक्के निकाल लागला आहे.
मुलींनीच मारली निकालात बाजी
जिल्ह्याच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.९२ टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.१५ टक्के आहे़ जिल्ह्यातील १३ हजार ६२६ मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार १८४ उत्तीर्ण झाले़ जिल्ह्यातील ८ हजार ४३३ मुलींनी बारावीची परीक्षा दिली़ त्यापैकी ७ हजार ८३६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
निकालाची टक्केवारी वाढली
परभणी जिल्ह्याच्या निकालाची यावर्षी टक्केवारी वाढली आहे़ गतवर्षी जिल्ह्याचा बारावीचा ८६.१३ टक्के निकाल लागला होता. औरंगाबाद विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये परभणी गतवर्षी सर्वात शेवटी होती. यावर्षी मात्र जिल्ह्याच्या निकालामध्ये कमालीची सुधारणा झाली असून, जिल्ह्याचा ९०.५९ टक्के निकाल लागला असून, पाच जिल्ह्यांमध्ये परभणीचा पहिला क्रमांक आला आहे.