शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

परभणी : लाभार्थ्यांचे साडेतीन हजार अर्ज झाले नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:19 IST

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत परभणी मंडळ कार्यालयाकडे ५ आॅगस्टपर्यंत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ५ हजार १२३ अर्ज मंजूर झाले आहेत़ परंतु, किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ त्यामुळे या प्रकारामुळे कृषीपंप धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत परभणी मंडळ कार्यालयाकडे ५ आॅगस्टपर्यंत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ५ हजार १२३ अर्ज मंजूर झाले आहेत़ परंतु, किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ त्यामुळे या प्रकारामुळे कृषीपंप धारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून ५ एकर पेक्षा अधिक जमीन असणाºया शेतकऱ्यांना ५ एचपी तर ५ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकºयांना ३ एचपी कृषीपंप देण्यात येणार आहेत़ ५ एचपी कृषीपंपाची किंमत ३ लाख ८५ हजार आहे तर ३ एचपी कृषीपंपाची किंमत २ लाख ५५ हजार रुपये आहे़हे पंप घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याना कृषीपंपाच्या या किंमतीच्य फक्त १० टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे़ विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीच्या वतीने पुढील पाच वर्षांसाठी कृषीपंपाची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकºयांच्या कृषीपंपांना अडथळ्याविना वीज पुरवठा मिळावा, यासाठी आता पारंपरिक वीज कनेक्शन न देता सौर वीज कनेक्शन दिले जाणार आहे़ परभणी मंडळ कार्यालयाकडे जानेवारी २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत म्हणजे ८ महिन्यांत ९ हजार २७८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत़ त्यापैकी ५ हजार १२३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले़परंतु, लाभार्थी शेतकºयांच्या सातबारावर जलस्त्रोतांचा उल्लेख नसणे, सामाईक सातबारा असणाºया लाभार्थ्यांनी संमतीपत्र सादर न करणे, सातबारावर हेक्टर ऐवजी एकरमध्ये उल्लेख नसणे, सातबारात चुका असणे या त्रुटींसह शेतकºयांकडे अगोदरच वीज कनेक्शन उपलब्ध असणे आदी किरकोळ त्रुटींमुळे ३ हजार ४९२ प्रस्ताव वीज वितरण कार्यालयाने नामंजूर केले आहेत़ त्यामुळे लाभार्थी शेतकºयामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे़दुष्काळात सापडलेल्या शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप या शेतकरी हिताच्या योजनेची अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकºयांना लाभ द्यावा, अशी अपेक्षा लाभार्थी कृषीपंप धारकांतून होत आहे़उपविभागनिहाय नामंजूर अर्ज४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत वीज वितरण कंपनीकडे जिल्ह्यातील १० उपविभागनिहाय अर्ज प्राप्त झाले होते़ त्यामध्ये वीज वितरण कंपनीने किरकोळ त्रुट्यांमुळे परभणी शहर या उपविभागांतर्गत ३९ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ मंजूर करीत किरकोळ त्रुटी असल्याने २२ अर्ज नामंजूर केले आहेत़ गंगाखेड उपविभागांतर्गत ५८३ अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३०१ प्रस्ताव मंजूर करीत २२९ प्रस्ताव नामंजूर केले़४परभणी ग्रामीण १ हजार १६८ प्राप्त झाले असून, ९३८ मंजूर करण्यात आले असून, ७६७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत़ पाथरी ४५८ नामंजूर, सेलू ४२० नामंजूर, जिंतूर ६७५ नामंजूर, सोनपेठ १३० नामंजूर, पालम ६० नामंजूर, मानवत २३९ नामंजूर तर पूर्णा ३९२ असे एकूण १० उपविभागांतर्गत ३ हजार ४९२ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे़केवळ २८ कामे पूर्ण४मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची जिल्ह्यात जानेवारी २०१९ पासून अंमलबजावणी सुरू झाली़ या योजनेला ८ महिन्यांचा कालावधी झाला आहे़ या ८ महिन्यांत वीज वितरण कंपनीने ५ हजार १२३ प्रस्ताव मंजूर केले असून, २ हजार ५१ लाभार्थी शेतकºयांनी आपल्या हिस्स्याची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे़ त्याचबरोबर ७७७ लाभार्थी शेतकºयांनी ज्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप घ्यायचा आहे, अशा कंत्राटदारांची निवड केली आहे़४या सर्व प्रक्रिया पूर्ण करीत वीज वितरण कंपनीने आतापर्यंत जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत असलेल्या २८ कृषीपंप धारकांना लाभ दिला आहे़ उर्वरित ५ हजारांच्यावर लाभार्थी शेतकरी आहेत़ शेतकºयांच्या हिताच्या असलेल्या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करीत कृषीपंपधारकांना लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीFarmerशेतकरी