लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.शहरातील विजयनगर भागातील रहिवासी शेख नौशाद अहमद कुरेशी हे एका खाजगी कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या पत्नी माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घराला कुलूप लावले होते. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ९ वाजेदरम्यान चोरट्यांनी घराला कुलूप असल्याची संधी साधत मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाख ९९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे व १ लाख ३५ हजार रुपये रोख असा ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक ए.एन. नागरगोजे तपास करीत आहेत.चोरट्यांनी पळविली दुचाकी४गंगाखेड : चक्कर येत असल्याने रस्त्यावर दुचाकी थांबवून रस्त्याच्या कडेला खाली बसलेल्या एका व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना २६ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक पदावर कार्यरत असलेले मुंजाजी विठ्ठलराव सोळंके (५७, रा.सारडा कॉलनी, गंगाखेड) हे २६ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन घरी जात होते.४ रस्त्यात अचानक त्यांना चक्कर आली. त्यामुळे परळी नाका परिसरात त्यांनी दुचाकी (क्र.एम.एच.२२/जे.९६०४) थांबवून थोडा वेळ रस्त्याच्या बाजूला बसले. हीच संधी साधत अज्ञात व्यक्तीने त्यांची दुचाकी पळवून नेली. आरडा-ओरडा करुनही तो थांबला नसल्याने २९ जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यावरुन दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : पूर्णेत घरफोडी करुन चोरट्यांनी लांबविला साडेतीन लाखांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:38 IST