शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:अपघातात एकासह ३६ शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:20 IST

धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह ३६ शेळ्या मृत्यू पावल्याची घटना झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर २१ मार्च रोजी मध्यरात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह ३६ शेळ्या मृत्यू पावल्याची घटना झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर २१ मार्च रोजी मध्यरात्री घडली.भोकरदन येथून एम.एच.१८-२५७६ या क्रमांकाचा ट्रक शेळ्या घेऊन परभणी-पूर्णामार्गे नांदेडकडे जात होता. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास कात्नेश्वर शिवारात या ट्रकचे समोरील चाक निखळले. त्यानंतर हा ट्रक कॅनॉलमध्ये जावून उलटला. या अपघातात ट्रकमधील लक्ष्मण सोनाजी गायकवाड (३५ रा. मनापुर ता. भोकरदन) हा जागीच ठार झाला. तसेच ३६ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. ट्रकमधील महमद अशफाक, शेख साबुल, महमद हनिफ, शेख एजाज, महमद अजरोद्दीन हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच जमादार विनोद रत्ने, मिर्झा बेग यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. शुक्रवारी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी ट्रक चालक सलीम खान युसूफ खान याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातPoliceपोलिस