शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

परभणी : ९३ हजार ग्रामस्थांना टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:25 AM

पावसाच्या लहरीपणाचा फटका जिल्हावासियांना सोसावा लागत असून, भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ हजार ८६७ ग्रामस्थांना ६३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ अर्धा पावसाळा संपला असून, पाण्याचे स्त्रोत अजूनही उपलब्ध झाले नसल्याने यापुढे हे संकट आणखी गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पावसाच्या लहरीपणाचा फटका जिल्हावासियांना सोसावा लागत असून, भर पावसाळ्यात जिल्ह्यातील ९२ हजार ८६७ ग्रामस्थांना ६३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ अर्धा पावसाळा संपला असून, पाण्याचे स्त्रोत अजूनही उपलब्ध झाले नसल्याने यापुढे हे संकट आणखी गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे़मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाला होता़ विशेष म्हणजे, अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही़ त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून जिल्हावासियांना टंचाईचे चटके बसू लागले़ सलग ९ महिने पाणीटंचाईने होरपळलेल्या जिल्हावासियांना यंदाच्या पावसाळ्यात मोठी अपेक्षा निर्माण झाली होती़ त्यामुळे जून महिन्यापासूनच पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जात असतानाच पाऊसही लांबत गेला़ विशेष म्हणजे पावसाळ्यातील दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ मात्र अजूनही मोठा पाऊस झाला नाही़त्यामुळे प्रकल्प आणि जलस्त्रोतात नवीन पाणी दाखल झाले नाही़ त्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे़ अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम असून, या टंचाईग्रस्त गावांसाठी जिल्हा प्रशासन जुलै महिन्यातही पाणीटंचाई निवारणाची कामे करीत आहे़यावर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात १०९ टँकरच्या सहाय्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला़ अल्प पावसावर काही प्रमाणात पाणीटंचाई शिथील झाल्याने ४६ टँकर कमी करण्यात आले असले तरी ६३ टँकर मात्र अजूनही ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत आहे़एकूण ९२ हजार ८६७ ग्रामस्थांना टँकरने पाणी दिले जात आहे़ त्यात पालम तालुक्यात सर्वाधिक २१ हजार ६५२ ग्रामस्थांना टँकरचे पाणी पुरविले जात असून, जिंतूर तालुक्यात १६ हजार ३४, पूर्णा तालुक्यात १८ हजार ४२७, गंगाखेड १० हजार ७०२, परभणी ९ हजार ४२७, सोनपेठ ६ हजार २७५, मानवत ५ हजार ७५६, सेलू ३ हजार ५६१ आणि पाथरी तालुक्यातील १ हजार ३२ ग्रामस्थांना टँकरने पाणी दिले जात आहे़ पाणीटंचाईची ही अवस्था जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कायम असून, आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर टंचाईग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे़५५ खाजगी टँकर सुरूच्जिल्हा प्रशासनाने ६४ गावांमध्ये ६३ टँकर सुरू केले आहेत़ त्यात ८ टँकर शासकीय असून, उर्वरित ५५ टँकर खाजगी स्वरुपाचे आहेत़ पालम तालुक्यात सर्वाधिक १४ गावांमध्ये १६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़च्जिंतूर तालुक्यात १० गावांमध्ये १० टँकर, गंगाखेड १० गावांमध्ये १० टँकर, पूर्णा १० गावांमध्ये ११ टँकर, परभणी ६ गावांत ४, मानवत ३ गावांत ३ तर पाथरी तालुक्यातील ३ वाड्यांसाठी १ टँकर सुरू करण्यात आले आहे़ या टँकरसाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विहिरींचे अधिग्रहण केले आहे़ एकूण ४१६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्यापैकी ६२ विहिरी टॅकरला पाणी देण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत़च्तर ३५४ विहिरींचे पाणी परिसरातील ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १०१ विहिरींचे अधिग्रहण झाले असून, जिंतूर तालुक्यात ८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे तर पालम ६६, सेलू ५०, पूर्णा ४७, परभणी आणि सोनपेठ प्रत्येकी २४, पाथरीत १२ आणि मानवत तालुक्यात ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़परभणी जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावेजिल्ह्यातील ६३ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यात ५१ गावे आणि १३ वाड्या, वस्त्यांचा समावेश आहे़च्जिंतूर तालुका : पांगरी, मांडवा, देवसडी, रायखेडा, कोरवाडी, मोहाडी, धमधम, वाघी धानोरा, वडी, घागरा.च्सेलू तालुका : तळतुंबा, पिंप्री गोंडगे, नागठाणा कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड़च्परभणी तालुका : सिंगणापूर, माळसोन्ना, गोविंदपूर, इस्माईलपूर, सारंगपूर, उजळांबा़च्पालम तालुका: चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामापूर तांडा, पेंडू खुर्द, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव, फुरतलाव तांडा, गंजी तांडा, पायरीका तांडा, वाडी बु़, मार्तंडवाडी, नरहटवाडी़च्पूर्णा तालुका : पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, हिवरा, पांगरा लासिना, पिंपळा भत्या, धोत्रा, वाई लासिना, निळा़च्गंगाखेड तालुका : गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी, सिरसम शे़, सुरळवाडी, महातपुरी तांडा, उमटवाडी, ढवळकेवाडी, फत्तूनाईक तांडा, गुंजेगाव़ सोनपेठ तालुका : नरवाडी, कोथाळा, खपाट पिंप्री़च्पाथरी तालुका : कानसूर तांडा, वाडी वस्ती़च्मानवत तालुका : पाळोदी, हत्तलवाडी, सावळी़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई