परभणी : पदभार घेत नसल्याने कर्मचाऱ्याचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:09 IST2019-01-23T00:09:25+5:302019-01-23T00:09:50+5:30
पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़

परभणी : पदभार घेत नसल्याने कर्मचाऱ्याचे निलंबन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़
पालम येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ३४ लाखांचा धान्य घोटाळा झाल्याचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे़ या प्रकरणात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी गोदामपाल एस़पी़ कांबळे यांना निलंबित केले होते तर प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक श्रीरंग कदम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ त्यानंतर कदम यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाºयांना खुलासाही दिला होता़
दरम्यान, गोदामपाल कांबळे यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या जागी सुमेध वाघमारे यांची नियुक्ती केल्याचे आदेश १० जानेवारी रोजी काढण्यात आले होते; परंतु, वाघमारे यांनी २१ जानेवारीपर्यंत पदभार स्वीकारला नाही़ त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नाही व कर्तव्यात कसूर केला म्हणून वाघमारे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी काढले आहेत़ त्यामुळे गोदामपालाचा पदभार न स्वीकारल्याने निलंबित झालेले वाघमारे हे जिल्ह्यातील तिसरे कर्मचारी ठरले आहेत़ या पूर्वी परभणी तहसील कार्यालयातील दोन कर्मचाºयांना याच कारणास्तव निलंबित करण्यात आले होते़ त्यानंतर वाघमारे यांच्यावर कारवाई झाली आहे़
मुळात गोदामपालाचा पदभार घेण्यास कर्मचारी का तयार नाहीत? यावर मात्र वरिष्ठांकडून मंथन केले जात नाही़ विशेष म्हणजे ज्या ज्या वेळी गोदामातील धान्याचा घोटाळा झाला आहे, त्या त्या वेळी फक्त गोदामपालावरच कारवाई झाली आहे़ या गोदामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी, गोदामपालावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी किंवा गोदामाची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी नियुक्त केलेले विशेष अधिकारी या पैकी कोणावरही कारवाई झालेली नाही, हे विशेष होय़
कदम यांची विभाग चौकशी प्रस्तावित
पालम येथील धान्य घोटाळा प्रकरणात प्रभारी तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक श्रीरंग कदम यांनी आपला खुलासा जिल्हाधिकाºयांकडे दिला असला तरी जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या विभाग चौकशीची शिफारस प्रस्तावित केली आहे़ यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होवू शकते़ विभाग चौकशीची प्रक्रिया ही वेळ खाऊ आहे़ त्यामुळे कदम यांच्यावर सध्या तरी कडक कारवाईचे संकेत प्रशासनाकडून मिळालेले नाहीत़
४दरम्यान, पुरवठा विभागातील अनियमितता प्रकरणात सातत्याने कर्मचाºयांवरच कारवाई केली जात असल्याच्या कारणावरून कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़ अनियमिततेस अधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचे कर्मचारी खाजगीत बोलत आहेत.