शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़गतवर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे़ आॅगस्ट महिन्यात पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली़ त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे़ उपलब्ध पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत़ या कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते़ तालुक्यात सर्वाधिक उस लागवडीचे क्षेत्र आहे़ या भागातील पाथरी आणि लिंबा येथील दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम संपल्यानंतर या भागात किमान २० हजार एकर उसाचे क्षेत्र असल्याची नोंद आहे़कारखाना कार्यक्षेत्रातील पाथरी, मानवत, सोनपेठ भागात अत्यल्प पावसाने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत़ सिंचनासाठी पाणी नसल्याने बागायती पिके जळून जात आहेत़ जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यावर या भागातील उसाचे क्षेत्र पूर्णत: अवलंबून आहे़ जायकवाडीचे दोन पाणी अवर्तन सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ऊस जोपासला़ परंतु, सध्या शाश्वत पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत आटले आहेत़ त्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून करण्यात येणारा पाणीपुरवठाही बेभरोस्याच्या झाला आहे़ त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़ परिणामी शेतकरी अडचणीत आहेत.बंधारे कोरडे पडल्याने दाहकता वाढलीच्सद्यस्थितीत गोदावरीच्या पात्रातील ढलेगाव आणि मुदगल दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत़ बंधाºयातील पाणी कमी झाल्याने गोदावरी पात्रात काही ठिकाणी सिंचनासाठी बसवलेले कृषी पंप महसूल प्रशासनाने काढून घेतले आहेत़च् जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही़ या भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर बनले आहे़ उपलब्ध उसाच्या क्षेत्रापैकी २० हजार एकरवरील क्षेत्र आज धोक्यात आले आहे़च्ऊस उत्पादक शेतकरी शेतातील उभा ऊस जाळून चिपाट होत असताना पाहात आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक कोंडीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़तालुक्यात बेभरवशाच्या सिंचन सुविधाच्पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रातील दोन्ही बंधारे आणि जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे दोन्ही सिंचन सुविधांचे स्रोत बेभरवशाचे वाटू लागले आहेत़च्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना हातची पिके जळत असताना पहावी लागत आहेत़ त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी शाश्वत पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़च्पाटबंधारे विभागाने पावले उचलत दुष्काळात सापडलेल्या बागायतदार शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ